डॉ.देशपांडे यांना जीवनगौरव तर अभिनेता भावे,लेले,नाग,हरि,पाटील यांना टीएमसीचे एक्सलन्स पुरस्कार प्रदान
पुणे/क्रांतीकुमार कडुलकर : सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहराच्या जागतिक क्रमवारीत पुणे बेंगळूरु, दिल्लीचे नाव आहे, हे काही भूषणावह बाब नाही. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा व नागरीकांनी वाहतुकीचे नियम व स्वयंशिस्त अंगिकारणे गरजेचे आहे.असे मत नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे व्हाईस ऍडमिरल तथा अतिविशेष सेवा मेडल प्राप्त अजय कोच्चर यांनी व्यक्त केले.
पुणे येथील टॉप मॅनेजमेंट कन्सोरशियम फाउंडेशनच्या (टीएमसीएफ) वतीने दिला जाणारा अवॉर्ड्स ऑफ एक्सलन्स पुरस्काऱाचे खराडी येथे वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यंदा परसिस्टंट सिस्टिमचे अध्यक्ष डॉ.आनंद देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले,तर अभिनेते सुबोध भावे,धावपटू आदित्य हरी,ऊर्जा बायो सिस्टिमचे संचालक गजानन पाटील,कर्करोगतज्ञ डॉ.शोना नाग, एनसीएलचे संचालक डॉ.आशिष लेले यांना एक्सलन्स ॲवार्ड देवून गौरवण्यात आले.
यावेळी टॉप मॅनेजमेंट कंसोरशियमचे सल्लागार लेफ्टनंट जनरल डी.बी शेकटकर, अध्यक्ष अश्विनी मल्होत्रा,सरचिटणीस डॉ जे.जी पाटील,वेकफील्ड कंपनीचे अध्यक्ष मुकेश मल्होत्रा,खजिनदार डी.व्ही वंडेकर,सुदर्शन बंसल,जेनिस सोमजी,अजय अगरवाल ,के के तापडिया,डॉ सुंदरी परचानी, डॉ गीता परवानी आदी उपस्थित होते.
आज पुण्याला ध्येयवेड्यांची गरज – भावे
पुणे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेली टीएमसीएफ हि संस्था आहे.पुणे शहराने देशाचे नेतृत्व केले.समाजात ध्येयवेडी माणसेच क्रांती घडवू शकतात. ध्येयवेडी आणि अगणिक माणसे पुण्यात राहतात. आज पुण्याच्या समस्या सोडविण्यासाठी शहराला वेड्या माणसांची गरज आहे. कारण वेडी माणसेच समाजात काहीतरी करू शकतात.असे उदगार अभिनेते सुबोध भावे यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.सत्कारमूर्ती पाटील, लेले, हरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
टॉप मॅनेजमेंट कन्सर्शिअमचे अध्यक्ष अश्विनी मलहोत्रा यांनी प्रास्ताविक तर डॉ जयसिंग पाटील यांनी आभार मानले.