Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याRamai Awas Yojana : रमाई आवास योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Ramai Awas Yojana : रमाई आवास योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Ramai Awas Yojana : नगरपरिषद भद्रावती क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध व्यक्तींना स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास योजना (Ramai Awas Yojana) अंतर्गत रु. 3 लाख उत्पन्न मर्यादा असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी 20 मार्च 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. Invitation to apply for the benefit of Ramai Awas Yojana

या योजनेच्या लाभासाठी अर्जदारानी नगरपरिषद भद्रावती येथे परिपूर्ण अर्ज सादर करावेत. असे आवाहन‌ नगरपरिषद भद्रावती चे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. विशाखा शेळकी यांनी केले आहे.

सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामासाठी रू २.५० लक्ष अनुदान देण्यात येते. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. लाभार्थ्यांकडे पक्के घर नसावे किंवा लाभार्थी बेघर असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रूपये ३ लक्ष पर्यंत असावे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ७/१२ उतारा, मालमत्ता नोंदपत्र, मालमत्ता नोंदवहीतील उतारा यापैकी एक, घरपट्टी, पाणीपटटी, विद्युत बिल या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र आवश्यक आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत, सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेला उत्पन्नाचा दाखल, दि. १/२/१९९५ च्या किंवा मतदार यादितील नांवाचा उतारा, निवडणुक ओळखपत्र, रेशनकार्ड, मालमत्ता कर भरल्याची पावती, सध्याचा कच्च्या घराचा फोटो, तहसीलदार यांनी दिलेले रहिवास प्रमाणपत्र किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. असेही कळविले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1BeXYQ5wGZXfk-1uMcUbenGG6BsCudfqZ/view?usp=drivesdk

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

ब्रेकिंग : बंगळुरूमध्ये भीषण पाणी टंचाई

मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून

मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार

पुण्यात एका अफवेने मध्यरात्री तणावाचे वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त

संबंधित लेख

लोकप्रिय