Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपुणे : श्री क्षेत्र देहुगाव येथे १ हजार वृक्षांची लागवड; विविध संस्थांचा...

पुणे : श्री क्षेत्र देहुगाव येथे १ हजार वृक्षांची लागवड; विविध संस्थांचा सहभाग

देहुगाव श्री. क्षेत्र देहुगाव येथे ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे, संत तुकारामांचे १० वे वंंशज ह.भ.प . शिवाजी मोरे अरुण पवार या मान्यवरांच्या शुभहस्ते ९ ते १० फुट उंचीच्या १ हजार झाडांची लागवड करण्यात आली.

यावेळी पिंपरी-चिंचवड, पुणे सह महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत २५,००० वृक्षारोपण करून ते ५ वॉटर टँकरव्दारे संगोपन केल्याबद्दल वृक्षमित्र अरुण पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहारा सोशल फाउंडेशन, अभंग प्रतिष्टान, श्रीक्षेत्र देहू, रोटरी क्लब, देहू ,स्व.डॉ.प्रा, वैभव सुलाखे मित्र परिवार वृक्षदायी संस्था, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोशल फाउंडेशन, स्व. प्रशांतदादा जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन, देहू इलेव्हन, कै. सौ. कमलताई नामदेव काळोखे, देहूगाव बैलगाडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. 

तसे सहारा वृद्धाश्रम कुसवली ता.मावळ येथे वृक्षाचे भव्य वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक/अध्यक्ष अरुण पवार, प्रबोधनकार, प्रवचनकार व सुप्रसिद्ध समुपदेशक शारदाताई मुंडे, मराठा सेवा संघ,पिं.चिं शहर अध्यक्ष अड.लक्ष्मण रानवडे, विजय जगताप प्राध्यापिका तृप्ती जगताप आदींची उपस्थिती होती.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय