आकुर्डी (पिंपरी चिंचवड) : कोरोनाच्या नव्या संसर्गामुळे सरकारने जनहितासाठी निर्बंध लागू केलेले आहेत. 2020 मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील बहुसंख्य अल्प वेतनधारी श्रमिक जनतेची आर्थिक आबाळ झाली होती. लाखो कुटुंबियांना चूल पेटवणे अवघड झाले होते. त्यामुळे निर्बंधांमुळे चुली बंद होणार नाहीत याची दक्षता घ्या, सरकारने किमान तीन महिन्याचे आगाऊ रेशन द्यावे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ऍड.नाथा शिंगाडे यांनी केली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड समितीच्या वार्षिक आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरभद्र स्वामी हे होते.
शिंगाडे म्हणाले, मार्च महिन्यात गरजू लोकांना खाद्यतेल, साखर, चहा डाळीसहित पुढील तीन महिन्याचे रेशन पुरवावे, ज्यांची रेशनकार्ड नियमित झालेली नाहीत, अथवा अन्य जिल्ह्यातील आहेत. त्यांना कोव्हीड शिक्का मारुन अन्नधान्य वितरण व्यवस्था सक्षम करावी.
या बैठकीस गणेश दराडे, बाळासाहेब घस्ते, सतीश नायर, अपर्णा दराडे, किसन शेवते, निर्मला येवले, रिया सागवेकर, सचिन देसाई, अमिन शेख, ख्वाजा जमखाने, स्वप्निल जेवळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.