Monday, May 6, 2024
Homeजिल्हापुणे - मुंबई दुचाकी रॅली पोलिसांनी रोखली, बंदी हुकूम मोडून कामगार मुंबईत

पुणे – मुंबई दुचाकी रॅली पोलिसांनी रोखली, बंदी हुकूम मोडून कामगार मुंबईत

पिंपरी चिंचवड : 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन निषेध दिन जाहीर केलेल्या पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीची हजारो कामगारांची मुंबईला निघालेली रॅली पिंपरी चिंचवड पोलिसांनी अडवली. पहाटे 4 वा पोलिसांचा मोठा फौजफाटा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे दाखल झाला होता.

पोलिसांनी यावेळी रॅलीत सामील झालेले रॅली निघताच पिंपरी पोलिसांनी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, कामगार नेते अनिल रोहम, वसंत पवार यांच्यासह शेकडो कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कृषी महाविद्यालय, पाथरी येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 मे शेवटची तारीख

केंद्रसरकारने एकतर्फी संमत केलेले चार कामगार कायदे रद्द करावेत, आणि पूर्वीचे कायदे अबाधित ठेवावेत या मागणीसाठी निषेध करणारी ही रॅली मुंबई येथे राजभवानावर निघाली होती. मात्र, पोलिसांनी सभेला परवानगी दिली होती. पिंपरी येथे सभा समाप्त झाल्यानंतर बंदी हुकूम मोडून सविनय कायदेभंग करत शेकडो कामगार दुचाकी रॅली सह मुंबईकडे रवाना झाले असल्याचे समजते.

10 वी / ITI उत्तीर्णांना संधी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांची मोठी भरती

सिटूच्या वतीने दडपशाहीचा निषेध 

पुणे – मुंबई दुचाकी रॅली पोलिसांनी रोखली, यांचा भिकू कामगार संघटनेने निषेध केला आहे. सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड म्हणाले, कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने केंद्र सरकारने केलेले कामगार विरोधी चार लेबर कोर्ट रद्द करावेत या मागणीसाठी मोटर सायकल रॅली आयोजित केली होती. परंतु यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलीस प्रशासनाची हे अत्यंत लोकशाहीविरोधी व कामगार विरोधी कृती आहे.

महा विकास आघाडी सरकार जर केंद्र सरकार प्रमाणेच कामगार विरोधी भूमिका घेणार असेल तर यापुढे आघाडी सरकारला सुद्धा तीव्र विरोध करण्याची भूमिका घ्यावी लागेल, असेही कराड म्हणाले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

Pune Nokari : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स, पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय