Pune : पुण्यातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांनी एका 24 वर्षीय महिलेचा घरीच गर्भपात केल्याने महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणात इंदापुर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेला गर्भपात करायला लावणाऱ्या तिच्या पती आणि सासऱ्याला अटक केली आहे, तसेच सासूविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिला चार महिन्यांची गर्भवती होती. त्या महिलेला आधी 1 मुलगा आणि 1 मुलगी होती.महिला पुन्हा तिसऱ्यांदा गरोदर राहिली. सासरच्या लोकांनी महिलेच्या गर्भाची तपासणी केली असता तिला मुलगी होणार असल्याचे समजले, असा संशय पोलिसांना आहे.
म्हणून महिलेच्या कुटुंबीयांनी तिचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. या गर्भपातासाठी एका खासगी डॉक्टरला बोलावून तिचा घरातच गर्भपात करण्यात आला.आणि नंतर फार्महाऊसच्या शेतात गर्भ दफन करण्यात आला. गर्भपातानंतर महिलेला प्रचंड रक्तस्त्राव झाला, ज्यामुळे तिची प्रकृती गंभीर बनली. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
इंदापुर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेची प्रकृती बिघडू लागली. दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच महिलेचा वाटेतच मृत्यू झाला.
महिलेच्या भावाने सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेत पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली असून, सासूवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले
गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज
जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा
पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ