Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता...

PCMC : सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ संपन्न

पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला. (PCMC)

यानिमित्त श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा व सहाय्यक सेक्रेटरी अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी कार्यक्रमास अध्यात्मिक विचारवंत डॉ. गजानन खासनीस, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण कोठावदे सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी, पोलीस अंमलदार- दामिनी पथक दिघे मॅडम, कदम मॅडम हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. (PCMC)

डॉ. गजानन खासनीस यांनी सध्याची शिक्षण पद्धती, विद्यार्थी जीवन याबद्दल श्री संत तुकाराम महाराज गाथेतील प्रबोधन यावर मनोगत व्यक्त केले.

डॉ. प्रवीण कोठावदे यांनी विद्यार्थिनींना पुढील महाविद्यालयीन जीवन व भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. भारती मॅडम यांनी महाविद्यालयीन जीवनासाठी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या व जीवनातील पुढील आव्हानांसाठी मोलाचे मार्गदर्शन देखील केले.

दिया बेहरा, प्रतीक्षा शिवशरण व समीक्षा पारखी या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले व महाविद्यालयात आलेल्या सुंदर अनुभवांचे वर्णन केले.

या कार्यक्रमासाठी प्रशासकीय व्यवस्थापक सतीश भारती, विभाग प्रमुख वसुधा पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख आशा डुंबरे यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.

अकरावीत नवीन प्रवेशीत विद्यार्थिनी, महाविद्यालयीन अध्यापक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता धनवडे आभार प्रदर्शन विजया बोठे यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय