Home जिल्हा वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदान करून ‘त्यांनी’ लोकशाहीच्या उत्सवात नोंदवला सहभाग

वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदान करून ‘त्यांनी’ लोकशाहीच्या उत्सवात नोंदवला सहभाग

वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदान करून 'त्यांनी' लोकशाहीच्या उत्सवात नोंदवला सहभाग Pune age 104, participated celebration democracy voting home

पुणे, दि. १६ : पर्वती मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक आणि उद्योगपती चंद्रभान पुनमचंद भन्साळी यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदानाद्वारे हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. श्री. भन्साळी यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि लोकशाहीबद्दलची दृढ निष्ठा यावेळी पहावयास मिळाली. प्रत्येकाने मतदान करून आपली लोकशाही बळकट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.(Pune)

निवडणूक निर्णय अधिकारी श्री मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वती मतदारसंघात गृह मतदान प्रक्रिया सूरू करण्यात आली आहे. फॉर्म १२ डी भरून गृह मतदानासाठी नोंदणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. भन्साळी यांचे गृह मतदान करून घेण्यासाठी हे पथक त्यांच्या घरी पोहोचले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटेश दुर्वास, नायब तहसीलदार सरिता पाटील पथकासोबत भन्साळी यांच्या उपस्थितीत गृहमतदानाची प्रक्रिया पार पडली.

Pune

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मॅरेथॉन दौडद्वारे केली मतदार जनजागृती; जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; जाणून घ्या सध्याचे भाव

रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा ; पत्नी रितिकाने मुलाला दिला जन्म

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तपासणार, रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी

मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर

चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य