Monday, July 8, 2024
Homeजिल्हाPune : निरोगी समाज देशाच्या प्रगतीत मोठा उचलणारा ठरतो; सुरेंद्र पठारे यांचे...

Pune : निरोगी समाज देशाच्या प्रगतीत मोठा उचलणारा ठरतो; सुरेंद्र पठारे यांचे मत

Pune : सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व योग समूह खराडी-चंदननगर यांच्या वतीने एकदिवसीय अक्षय्य योगा शिबिर आयोजित करून जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. खराडी येथील पठारे इनडोअर स्टेडियम या ठिकाणी हे शिबिर संपन्न झाले. ‘योग स्वत:साठी व समाजासाठी’ ही या वर्षीची संकल्पना राबवत सर्वांच्याच सुदृढ व निरोगी आरोग्याच्या उद्देशाने हे शिबिर राबवण्यात आले. (Pune)

यावेळी सूर्यनमस्कार, कपालभाती, अनुलोम-विलोम, वृक्षासन, ताडासन, हलासन, पद्मासन, वज्रासन, शवासन इत्यादि प्राणायाम व योगासनांची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. एकूण ५५२ नागरिकांनी यात सहभाग घेतला होता. यात वयोवृद्ध, लहान मुलेदेखील मोठ्या उत्साहात उपस्थित होती.   

“योग हा आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र आहे आणि रोजच्या जगण्यात योगसाधनेचे कमालीचे महत्त्व आहे. शरीर व मन यांना जोडणारा दुवा म्हणून योगाभ्यासाकडे पाहिले जाते. नियमित योग असेल तर अनेक व्याधींपासून, आरोग्याच्या तक्रारींपासून दोन हात लांब राहता येणे सहज शक्य आहे. निरोगी समाज देशाच्या प्रगतीत मोठा उचलणारा ठरतो आणि म्हणूनच सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी हे शिबिर राबवून नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रयत्नशील आहे”, असे प्रतिपादन सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी केले. (Pune)

“अक्षय्य योगा शिबिरामुळे आम्हाला योगासनांचे, प्राणायम, ध्यानधारणा व एकूणच योगशास्त्राचे महत्त्व समजले. रोजच्या धकाधकीच्या आयुष्याला योगामुळे येणारा निवांतपणा व मन:शांती आज शिबिरामुळे अनुभवता आली. दैनंदिन जीवनात योग करायला हवा याची जाणीवही निर्माण झाली असून नियमितपणे योग करण्याचा आम्ही निश्चय केला आहे”, असे मत व्यक्त करत नागरिकांनी सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे आभार मानले. 

या एकदिवसीय योगा शिबिराच्या प्रसंगी, वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे, योग प्रशिक्षक दीपक एदलाबादकर तसेच योग समूहाचे इतर प्रशिक्षक, स्वयंसेयवकही उपस्थित होते. योगाच्या साहाय्याने ‘निरोगी भारत, आरोग्यसंपन्न भारत’ निर्माण करण्याचा संकल्प करुयात, असे आवाहन यावेळी बापूसाहेब पठारे यांनी केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती

वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय