Pune: शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या आवारात १६ वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवकांपैकी दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी मुले एकमेकांच्या ओळखीची नाहीत. संबंधित प्रकार सामूहिक अत्याचाराचा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये ओम आदेश घोलप (वय २०) आणि स्वप्नील विकास देवकर (वय २२) यांचा समावेश आहे. तर दोन अल्पवयीन आरोपीही या प्रकरणात सहभागी असल्याचे समजले आहे. पीडित युवतीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ती अकरावीत शिक्षण घेत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक तिच्या महाविद्यालयात शिकत असून अन्य तीन युवक दुसऱ्या महाविद्यालयात शिकतात. समाज माध्यमांद्वारे पीडित मुलीची आरोपींशी ओळख झाली होती.मुलगी अल्पवयीन असल्याची जाणीव असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
अत्याचाराची बाब उघडकीस कशी आली?
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी एका कार्यक्रमासाठी संबंधित महाविद्यालयात गेल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांनी युवतींना महिला अत्याचाराबाबत जनजागृतीपर माहिती दिली. या वेळी पीडित मुलीच्या एका मैत्रिणीने तिच्यावर घडलेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली. आरोपींनी अत्याचाराच्या घटनेची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचाही खुलासा झाला आहे. यानंतर पोलिसांनी त्वरीत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Pune
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले
गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज
जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा