पिंपरी चिंचवड – राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी माळवा प्रांतांची सूत्र हाती घेतल्यानंतर अनेक युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले . राज्यातील अशांततेचे वातावरण दूर करत जनतेला धीर दिला, राज्याचा विकास व्यवस्थित होण्याच्या उद्देशाने प्रांतवार विभागणी केली, स्त्रीशक्तीच्या बाजूने नेहमी उभ्या राहिल्या विधवा स्त्रियांचे हक्क मिळण्याकरिता त्यांनी कायद्यात बदल केले. विधवांना मूल दत्तक घेण्याच्या हक्क देखील प्राप्त करून दिला. साहस,पराक्रम, वीरतायाचे प्रतीक म्हणजे अहिल्याबाई होळकर होत्या असे मत कामगार नेते काशिनाथ खते आणि व्यक्त केले. (PCMC)
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,बांधकाम कामगार समिती,महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीतर्फे आज सामाजिक कार्यकर्ते यशवंत होळकर यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, धाराशिव जिल्हा अध्यक्ष दादा खताळ, मनपा सदस्य सलीम डांगे, समाधान कदम, निरंजन लोखंडे, विजय लहाने,अनिता कदम, वंदना सावंत,अंजना भुसे, सुनंदा जाधव, लक्ष्मी कोरे आदि उपस्थित होते. (PCMC)
अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांना कुंभेर येथील युद्धात वीरमरण प्राप्त झाल्यानंतर चिरंजीव मालेराव यांच्या हातात नेतृत्व दिले मात्र दुर्दैवानं त्यांचाही मृत्यू झाला असे दोन आघात पचवून अहिल्याबाई यांनी राज्यकारभार चालवण्यास मोठ्या धिटाने सुरुवात केली.
होळकर म्हणाले की अहिल्याबाईने अनेक धार्मिक आणि प्रसिद्ध तीर्थस्थळाचे निर्माण कार्य पूर्ण केले. मोठ्या कौशल्यांनी आणि कुशाग्रतेने किल्ले, विश्रामगृह, पिण्यासाठी पाण्याच्या विहिरी व अनेक रस्त्याची निर्मिती केली ते आजही आपणास विविध ठिकाणी दिसत आहेत.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : अहिल्याबाई होळकर या साहस, पराक्रम आणि विरतेचे प्रतीक – काशिनाथ नखाते
---Advertisement---
- Advertisement -