अंबाजोगाई : अंसघटीत कामगार, बांधकाम कामगार या वर्गासाठी शासनाने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी दरवर्षी या कामगारांना नोंदणी करणे आवश्यक असते. अंबाजोगाईत हा कामगार हजारोच्या संख्येने आहे, परंतू यांची नोंदणी करण्याची सोय फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी आहे.
कामगारांना पैसे खर्च करून बीड ठिकाणी 100 किमी प्रवास करून जावे लागते, या त्रासामुळे बीड जिल्हयातील असंघटीत कामगार, बांधकाम कामगार नोंदणी अत्यंत कमी झाली आहे. या कारणामुळे शासनाच्या लाभापासुन हे कामगार वंचित राहत आहेत.
आज उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना “डीवायएफआय” या संघटने तर्फे असंघटीत कामगार, बांधकाम मजुर नोंदणी तालुकास्तरावर अंबाजोगाईत करून शासन लाभ त्वरीत मिळण्याची सोय करावी, हि मागणी करण्यात आली. यावेळी प्रशांत मस्के, जगन्नाथ पाटोळे, देविदास जाधव, सुहास चंदनशिव, अभिमन्य माने उपस्थित होते.