तैवान : तैवानमध्ये भीषण रेल्वे अपघात रेल्वे अपघातात ३६ जणांचा मृत्यू, ७२ जखमी झाल्याची प्राथमिक माहितीसमोर आली आहे. तर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.
तैवानमधील पूर्वेकडील भागात रेल्वे रूळावरुन घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पूर्व तैवानमधील तोरोक जॉर्ज परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ट्रेनमधून जवळपास ३५० प्रवासी प्रवास करत होते. एएनआय न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, अपघातात ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ७२ जखमी झाले आहेत. तर चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
या रेल्वे अपघाताच्या संदर्भातील फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियात शेअर होत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रेल्वेचे डबे रूळावरुन घसरले आहेत. तसेच रेल्वेतील प्रवाशांचे सामान इतरत्र पडलेले दिसत आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले असून जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.