Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यामाकप'च्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने

माकप’च्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने

औरंगाबाद (प्रतिनिधी): तेलाचे आंतरराष्ट्रीय भाव पडत असतानाही मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव गेल्या तीन आठवड्यांत ९ ते १० रुपये प्रति लिटर असे प्रचंड वाढवले आहेत. त्यामुळे डाव्या पक्षांच्या वतीने आज देशभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष औरंगाबादाच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.

   शहरामध्ये अजबनगर येथील पक्ष कार्यालयासमोर हातामध्ये विविध मागण्यांचे पोस्टर धरून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. वाळूज MIDC परीसरातील कामगारांनी वाळूज येथे निदर्शने केली तर पैठण शहरातही पंचायत समिती कार्यालयासमोर इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.

  यावेळी पेट्रोलियम पदार्थांच्या उत्पादनावर लादलेला अतिरिक्त अबकारी कर कमी करा, आंतराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमती नुसारच पेट्रोल डिझेलचे दर ठरवा, आदी मागण्या करण्यात आल्या. 

   यावेळी औरंगाबाद शहरात माकपचे जिल्हा सचिव भगवान भोजने, शहर सचिव श्रीकांत फोपसे, नितीन वाव्हळे, सुनील राठोड,बाबासाहेब वाव्हलकर, सुनिता लोंढे, अश्फाक शेख, गौतम चाबुकस्वार, सचिन गंडले, सतीश कुलकर्णी, मुरलीधर काळे, अशोक पारधे, गणेश शिंदे आदीसह उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय