Tuesday, May 7, 2024
Homeराज्यवाढत्या महिला अत्याचाराविरोधात चैत्यभूमी येथे डाव्या संघटनांच्या वतीने निदर्शने

वाढत्या महिला अत्याचाराविरोधात चैत्यभूमी येथे डाव्या संघटनांच्या वतीने निदर्शने

मुंबई : वाढत्या महिला अत्याचाराविरोधात चैत्यभूमी येथे डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI), जाती अंत संघर्ष समिति (JASS), दलित शोषित मुक्ति मंच(DSMM), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन (CITU), अखिल भारतीय जनवादी महिला संघटन (AIDWA) यांच्या संयुक्त विद्यमाने दादर चैत्यभूमि येथे हाथरस अत्याचाराविरुद्ध तसेच अन्य ठिकाणी होत असलेल्या दलित अत्याचारांविरूध्द तीव्र निदर्शने करण्यात आली.

हाथरस येथे एका दलित युवतीवर झालेला सामुहिक बलात्कार व भीषण शारिरिक हिंसेमुळे तिचा झालेला मृत्यू या घटनेला २८ ऑक्टोबर रोजी एक महिना होत आहे. गंभीर व निंद्य अपराध नंतरही पीडित परिवाराला न्याय मिळेल अशी चिन्हे दिसत नाहीत. उत्तर प्रदेशातील पोलिस तसेच अन्य अधिकार्‍यांच्या निवेदनानंतर ते गोंधलळ्याचे वातावरण निर्माण करीत असल्याचे लक्षात येते. ह्या बिभत्स हत्याकांडावरून लोकांचे लक्ष उडावे व अन्यायाग्रस्त कुटुंबाकडेच लोकांनी संशयाने पहावे असा प्रयत्न शासकीय यंत्रणा करीत आहे ह्या घटनेनंतर लोक प्रक्षुब्ध झाले. जनतेचा असंतोष सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रकट होऊन उत्तर प्रदेशात बलात्काराचे अन्यायाचे सत्र सुरूच आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांत या घटना ह्या घटना क्रमांनी आता सिध्द झाले असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय