रत्नागिरी : नंदुरबारच्या खासदार ह्या जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्या विरोधात बदनामी करणारे रोज नवीन नवीन विडीओ बनवून विनाकारण सोशल मिडीयावर टाकत आहेत.हे बदनामीचे काम हिना गावीत यांनी थांबवले नाही तर आदिवासी कार्यकर्ते बिरसा क्रांती दल संघटनेसह रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन छेडतील असा आंदोलनाचा इशारा सुशिलकुमार पावरा सामाजिक कार्यकर्ता तथा कोकण विभाग प्रमुख व अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी दिला आहे. लवकरच ते तशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस अधिक्षक नंदूरबार यांना देणार आहेत.
डाॅ.हिना गावीत यांची जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याशी काय दुश्मनी आहे? की डाॅ.राजेंद्र भारूड यांच्या वर सध्या त्या सारख्या आरोप करत आहेत.” नंदुरबार बना देश का मिसाल, कलेक्टर हो तो ऐसा” अशा बातम्या देशभर फिरत आहेत. संपूर्ण देशभर राजेंद्र भारूड कलेक्टर नंदुरबार यांचे कौतुक केले जात आहे. सिने अभिनेता अजय देवगण व अमिर खान राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. हिंदी न्यूज,मराठी न्यूज व इंग्रजी न्यूज चॅनेल वाले सुद्धा राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. सोशल मिडीवरही राजेंद्र भारूड यांच्या कामाची प्रशंसा लाखो प्रेक्षक करत आहेत. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाने सुद्धा कोरोनाबाबतच्या नंदुरबार जिल्ह्यातील कामाचे कौतुक केले आहे. अशा वेळी हिना गावीत खासदार नंदुरबार यांनी राजेंद्र भारूड यांच्यावर आरोप करण्याऐवजी प्रशंसा केली पाहिजे. त्यांना साथ दिली पाहिजे. मात्र तसे होत नाही आहे. हिना गावीत यांनी राजेंद्र भारूड यांचे कौतूक केले तर हिना गावीत यांची ऐपत वाढेल,लोक त्यांचे कौतुक करतील. नंदुरबार कलेक्टर यांचे मनोबल वाढविण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम खासदार हिना गावीत करीत आहेत.
नंदुरबार सारख्या एका आदिवासी जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी ऑक्सीजन प्लांट तयार करून संपूर्ण देवासमोर आदर्श निर्माण केला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. ही नंदुरबार साठी व आदिवासींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु हीनाताई गावीत यांच्या कडून कलेक्टर राजेंद्र भारूड यांचे कौतूक करायला तोंडातून दोन शब्द बाहेर पडत नाहीत. उलट राजेंद्र भारूड यांची ऑक्सीजन प्लांटबाबत थापेबाजी, खोट्या बातम्या, खोटी माहिती, नंदुरबार मध्ये ऑक्सीजनचा तुटवडा वगैरे बोलून राजेंद्र भारूड यांचे खच्चीकरण करत आहेत. याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो.असे सुशिलकुमार पावरा म्हणाले.
जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्या वर आरोप करून हिना गावीत खूप मोठी चूक करत आहेत. याचे त्यांना नूकसानच होणार आहे. खरं पाहिलं तर राजेंद्र भारूड हे स्वत: डाॅक्टर असून आदिवासी समाजाचे आहेत. त्यामुळे त्यांना आदिवासी जनतेच्या समस्या ब-यापैकी माहिती आहेत. अशा वेळी चांगले काम करणा-या अधिका-याचे मनोबल वाढवले पाहिजे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्या वर आरोप करून हिना गावीत यांना तर याचा अजिबात फायदा होणार नाही. पुढे नुकसान च सोसावे लागेल. यावेळी हाॅस्पीटलची, बेडची, रेमडीसीवरची,