Friday, December 27, 2024
Homeआंतरराष्ट्रीयइस्रायलमध्ये गृहायुद्धाची शक्यता - रक्तरंजित काळरात्री

इस्रायलमध्ये गृहायुद्धाची शक्यता – रक्तरंजित काळरात्री

इस्रायल : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष कमी व्हावा, यासाठी अमेरिकेचे राजदूत तेल अविवमध्ये दाखल झाले आहेत. अमेरिकी राजदूत हॅडी आम्रा हे इस्रायल, पॅलेस्टाईन आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून युद्धबंदीसाठी प्रयत्न करणार आहेत. 

रविवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक होत आहे. या बैठकीआधी अमेरिकेचे राजदूत हॅडी आम्रा तेल अविवमध्ये दाखल झालेत. “शाश्वत शांततेसाठी काम करण्याची गरज दृढ करणे”, हा हॅडी यांच्या दौऱ्याचा उद्देश असल्याचं इस्रायलमधल्या अमेरिकी दूतावासाने म्हटलं आहे.

इस्रायलने शनिवारी पहाटे गाझाच्या पश्चिमेकडे असलेल्या शरणार्थी शिबिरावर केलेल्या हवाई हल्ल्यात कमीत कमी 7 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाल्याचं आणि यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचं पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे.

गाझातील अतिरेक्यांनीही रॉकेट हल्ला करत इस्रायलच्या बीरशेबा शहराला लक्ष्य करून इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं. शुक्रवारी हा संघर्ष वेस्ट बँकपर्यंत पोहोचला. ज्यात कमीत कमी 10 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

इस्रायलमध्ये गृहयुद्धाची शक्यता

इस्लायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता गाझापट्टीनंतर पॅलेस्टाईनच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकेच्या बहुतांश भागात पसरला आहे. वेस्ट बँकच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या हिंसाचारात कमीत कमी 10 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जखमी झाले आहेत.

इस्रायलचं सैन्य अश्रूधुराचे गोळे आणि रबर बुलेट्सचा वापर करत आहे. तर पॅलेस्टाईनने अनेक ठिकाणी पेट्रोल बॉम्ब फेकले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय