Friday, May 3, 2024
Homeजिल्हाशौर्या आर्या प्रतिष्ठान आणि महाएनजीओ फेडरेशन तर्फे प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कुल...

शौर्या आर्या प्रतिष्ठान आणि महाएनजीओ फेडरेशन तर्फे प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कुल राखी पौर्णिमा साजरी

कोल्हापूर : महाएनजीओ फेडरेशन ऑफ महाराष्ट्र राज्य, शौर्या आर्या प्रतिष्ठान आणि आत्मसहाय्य सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला बीजराखी रक्षाबंधन सोहळा प्रिन्स शिवाजी इंग्लिश मेडियम स्कूल कोल्हापूर येथे संपन्न झाला.

यावेळी महाएनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून देण्यात आलेल्या, आदिवासी भागातील महिलांनी बनवलेल्या बीज राखी शाळेतील विद्यार्थ्यांना बांधण्यात आल्या.

यावेळी बोलताना महाएनजीओ फेडरेशन समन्वयक अशोक पोतनीस म्हणाले की या बीज राख्यांवर असलेल्या विविध वनऔषधी, आयुर्वैदिक फळ आणि फुल झाडांच्या बिया विद्यार्थ्यांनी त्यांच्या घराच्या परिसरात पुरून त्यातून तयार होणाऱ्या रोपांचे संवर्धन कराव हा यामागचा पर्यावरणपूरक उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटबंधारे विभाग (दक्षिण) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने होत्या. शौर्या आर्या प्रतिष्ठान च्या संचालिका पल्लवी अभिजीत कदम यांनी स्मिता माने यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्मिता माने यांनी जिल्ह्यातील नद्या, धरणे आणि पाटबंधारे विभागाच्या कार्याची माहिती दिली.

याप्रसंगी शौर्या आर्या प्रतिष्ठान चे अध्यक्ष इंजि. अभिजीत कदम, उपाध्यक्ष राजेंद्र भोईटे, आत्मसहाय्य सामाजिक संस्थेच्या कोषाध्यक्षा श्रीमती दिप्ती कदम, संजिवनी बिडीकर, मुख्याध्यापिका रेणू निंबाळकर, शौर्या कदम, आर्या कदम, शिक्षिका वैशाली काळे, विशाखा कांबळे, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाएनजीओ संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा, कार्यकारी संचालक अक्षय भोसले, संचालक मुकुंद शिंदे, संचालक चंद्रकांत राठी यांचें मोलाचं सहकार्य लाभले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय