Thursday, May 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडनारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री-प्रायमरी शाळेत शाळापूर्व पालक मेळावा उत्साहात संपन्न

नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री-प्रायमरी शाळेत शाळापूर्व पालक मेळावा उत्साहात संपन्न

भोसरी : सोमवार दिनांक १३ जून२०२२ रोजी सकाळी ९:३० ते १२:३० या वेळेत शाळापूर्व पालक मेळावा शिक्षण संस्थेच्या विभागाच्या वतीने घेण्यात आला. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक वैशाली तळेगावकर (प्राचार्य, ज्ञान प्रबोधिनी निगडी प्री-प्रायमरी विभाग) प्रमुख पाहुणे दिगंबर ढोकले (सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ, ज्येष्ठ प्रवचनकार,) हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटन: वटवृक्षाच्या पूजनाने पालकांच्या हस्ते करण्यात आली. सर्व उपस्थित पालकांचे स्वागत शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये शाळेविषयी सर्वांगीण माहिती पालकांना देण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

यावेळी वैशालीताई तळेगावकर, पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या “राष्ट्र घडवण्यासाठी मुले घडविणे महत्त्वाचे असते. व हे काम पालक आणि शाळा यांनी करावयाचे असते. मुलांसाठी संस्कारक्षम कृतिशील, विद्यार्थी केंद्रे आणि आनंदाची शिक्षणाची गरज आहे. शाळा ही समाजाचे केंद्र आहे. शाळेने विद्यार्थ्यांबरोबर पालकांसाठी / समाजासाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. व पालकांकडून सुद्धा शाळेसाठी विविध अंगाने मदत करण्याच आवश्यकता आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी वेळ, प्रेम, आणि संरक्षक दिले पाहिजे. मातृभाषेपासून त्यांना दूर जाऊ देता कामा नये. केवळ शाळेवर अवलंबून न राहता पालकांनी जागृत राहून आपल्या मुलांचा विकास साधला पाहिजे.”

प्रमुख पाहुणे दिगंबर ढोकले मार्गदर्शन करताना म्हणाले”देशाचे भवितव्य वर्गावर्गात घडत असते. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी न बनवता त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला पाहिजे. बाल मानसशास्त्राचा विचार करून लहान मुलांना घडवण्याची जबाबदारी पालक आणि शिक्षक दोघांनी एकत्रित पणे पार पाडली तर सक्षम पिढी निर्माण होण्यास मदत होईल.” कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप बेडुंरे हे होते.

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी

कार्यक्रमासाठी नारायण हट शिक्षण संस्थेचे पदाधिकारी मुकुंदराव आवटे, शिवराम काळे, रोहिदास गैंद, मनोज पवार, शोभाताई आरुडे, रोहिणी पवार, उज्वला थिटे हे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये पालकांच्या वतीने सहादु बागुल, मिनीनाथ सस्ते, विवेक जगताप (C.A ), शिवराम काळे यांनी मनोगत व्यक्त केली.

शिक्षक वर्गाच्या वतीने प्रतिभा तांबे यांनी शाळेच्या सर्व गोष्टी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक वर्गनिहाय पालकांचे गट करून त्या गटांना त्या – त्या वर्गशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माळी, उद्यान अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य, विजय चौगुले, यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वर्गाच्या वतीने प्रतिभा तांबे, मीनल बागुल, सायली संत, भाग्यश्री नगरकर, सुरेखाताई मुके, प्रवीण भाकड यांनी केले. शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे गुलाब पुष्प देऊन स्वागत मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.

सूत्रसंचालन प्रा.डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी केले तर आभार अंकुश गोरडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने झाली.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 196 विविध जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय