Sunday, December 8, 2024
HomeNewsपोनियिन सेल्वन पार्ट 1( PS 1) ने तोडला KGF चा रेकॉर्ड...

पोनियिन सेल्वन पार्ट 1( PS 1) ने तोडला KGF चा रेकॉर्ड कमावले ” इतके” कोटी !

मुंबई : मणिरत्नमचा नुकताच रिलीज झालेला ‘पोनियिन सेल्वन: पार्ट 1’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला आहे. चोल साम्राज्यावर आधारित हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होताना दिसत आहे.या चित्रपटाने केवळ देशातच 200 कोटींचा आकडा पार केला आहे.

चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह कार्ती, जयम रवी आणि त्रिशा कृष्णन यांसारख्या सुपरस्टार्सच्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटाची चर्चा आजकाल सर्वत्र आहे. या चित्रपटाला तमिळनाडूतून प्रचंड प्रेम मिळत आहे. रिलीज होऊन फक्त 10 दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. यासोबत रिलीज झालेला विक्रम वेधा हा चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत खूपच कमी राहिला आहे. पण तिथे पोनियिन सेल्वनने यशाच्या सर्व आयामांना स्पर्श केला आहे. पोनियिन सेल्वनने अवघ्या काही दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार केला. आता त्याचा दुसरा आठवडा उलटून गेला असून या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातच चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाचा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, जर आपण तमिळनाडू राज्याबद्दल बोललो, तर तेथेही पोन्नियिन सेल्वन 1 हा चित्रपट एकट्या तामिळनाडूमधून या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय