पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना परसबागेत जाऊन कारले, दोडके, गवार, श्रावणी घेवडा, भोपळा, वाल, वांगी, पपई, पेरू, घोसाळे कडीपत्ता, ई पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांच्या घरी जाऊन लावले व ज्यांच्याकडे परसबाग नाही अशा नागरिकांना प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांच्या घरी कुंढीत लावण्यासाठी बिया मोफत दिल्या. रसायन मुक्त भाजी आणि तरुण पिढीसमोर कृषी संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी शहरात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे अण्णा जोगदंड यांनी सांगितले.
नवी सांगवी, पिंपळे गुरव, डांगे चौक, काळेवाडी, चिंचवडगाव, आकुर्डी व आजुबाजूच्या उपनगरातही फळभाज्यांच्या बियांचे वाटप करण्यात आले. यावेळी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरुषोत्तम सदाफुले, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, विकास शहाणे, मुरलीधर दळवी, सुभाष चव्हाण, सचिन करंजवणे, संजना करंजावणे, डॉ.भाऊसाहेब लोंढे, जयश्री गुमास्ते, अरविंद मांगले, मीना करंजवणे, वसंतराव चकटे, अलकाताई लोंढे, धनंजय महाले, गजानन धाराशिवकर इ मान्यवरांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला.
संपादन – क्रांतिकुमार कडुलकर