Friday, December 27, 2024
Homeग्रामीणपिंपरी चिंचवड : शहीद कामगार कॉम्रेड दत्ता पाडाळे पुतळ्याचे नूतनीकरण करून देखभालीची...

पिंपरी चिंचवड : शहीद कामगार कॉम्रेड दत्ता पाडाळे पुतळ्याचे नूतनीकरण करून देखभालीची व्यवस्था करा – माकप

पिंपरी चिंचवड : शहीद कामगार कॉम्रेड दत्ता पाडाळे पुतळ्याचे नूतनीकरण करून देखभालीची व्यवस्था करा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर उषाताई ढोरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कामगार नगरीत बलिदान झालेल्या कामगार नेत्याच्या शिल्पाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सतीश नार्यर यांनी केला आहे.

आकुर्डी येथील शहीद कॉम्रेड दत्ता पाडाळे यांच्या आकुर्डी येथील पुतळ्याची दुर्दशा झाली आहे. महानगरपालिकेने 1979 च्या बजाज कामगार आंदोलनातील गोळीबारारात शहीद झालेल्या दत्ता टाडाळे यांचा अर्ध पुतळा आकुर्डी येथे 11 मार्च 1989 रोजी अतिशय छोट्या जागेमध्ये अनावरण केला आहे. 

सध्या या पुतळ्यासमोर दुचाकी आणि रिक्षा यांचे अवैध पार्किंग असते. आजूबाजूला वडापाव चहाच्या गाड्या असतात. पुतळ्याची स्वच्छता दररोज होत नाही. शहरातील अनेक पुतळ्याचे देखभाल व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळ आहे. मात्र शहीद कामगार दत्ता पाडाळे यांना कोणताही सन्मान दिला जात नाही. या कामगार नगरीत बलिदान झालेल्या कामगार नेत्याच्या शिल्पाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हे अतिशय निषेधार्ह आहे, असा आरोप सतीश नायर यांंनी​ केला आहे.

पुतळ्याच्या सभोवतालची अतिक्रमणे हटवावीत, पुतळ्याला मेघडंबरी लावावी आणि रात्रीची प्रकाशाची व्यवस्था करावी, विशेष आर्थिक तरतूद करून पुतळ्याचे सुशोभीकरण करावे. दररोज स्वच्छता केली जावे, यासाठी कर्मचारी नेमावेत, शहिद कामगारांच्या बलिदानाचा इतिहास शिल्प तयार करावे, या मागण्या माकपच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर गणेश दराडे, सतीश नायर, वीरभद्र स्वामी, अपर्णा दराडे, अमिन शेख, बाळासाहेब घस्ते, क्रांतिकुमार कडुलकर, सचिन देसाई, स्वप्निल जेवळे, ख्वाजा जमखाने, अविनाश लाटकर यांच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय