Tuesday, May 7, 2024
HomeNewsPCMC:एस. बी. पाटील हे कर्तव्य आणि जबाबदारी यांचा आदर्श - कुलगुरू डॉ....

PCMC:एस. बी. पाटील हे कर्तव्य आणि जबाबदारी यांचा आदर्श – कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी

पीसीयू मध्ये एस. बी. पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिरसह विविध उपक्रम

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१५ – सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना शिक्षण क्षेत्रात सर्वांना प्रेरणादायी ठरेल अशी संस्था स्थापन करून कर्तव्य आणि जबाबदारी यांचा आदर्श शंकरराव बाजीराव पाटील यांनी घालून दिला आहे. पीसीईटी मधून शिक्षण घेऊन आज हजारो विद्यार्थी देश, परदेशात एस. बी. पाटील यांच्या आदर्श मार्गावर काम करून देशाचा नावलौकिक वाढवीत आहेत.एस. बी. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचे पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या रूपाने वटवृक्षात रूपांतर झाले आहे.आगामी काळात आणखी उच्चतम दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सुविधा विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध देण्यात येतील असे पीसीयू च्या कुलगुरू डॉ.मनिमाला पुरी यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) संस्थापक आणि माजी खासदार कर्मयोगी स्व. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या जन्म शताब्दी निमित्त पिंपरी चिंचवड विद्यापीठसह (पीसीयू) सर्व संस्थांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून एस. बी. पाटील यांना अभिवादन करण्यात आले.
यामधे साते, वडगाव मावळ येथील पीसीयू च्या प्रांगणात कुलगुरू डॉ.मनिमाला पुरी यांच्या हस्ते देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच इंजिनिअरिंग,फार्मसी आणि विद्यार्थी कल्याण समितीच्या रक्तदान शिबिर घेण्यात आले. उप कुलगुरू डॉ.राजीव भारद्वाज यांच्यासह सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
.


पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे,उपाध्यक्ष पद्माताई भोसले,सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील,उद्योजक नरेंद्र लांडगे,अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई आदि सह सर्व शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत विश्वस्त कार्यालयात कर्मयोगी स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) मध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले.तसेच पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,एस. बी. पाटील इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट,एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, पुणे बिझनेस स्कूल या संस्थांमध्येही एस.बी.पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सर्व प्राचार्य,संचालक, प्राध्यापक आणि कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय