पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:प्रहार अपंग संघटना पिंपरी चिंचवड शहर व स्पार्क मिंडा यांच्या संयुक्त विद्यमानाने चऱ्होली येथे दिव्यांग सशक्तीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात १५० अपंग बंधू आणि भगिनींनी काठी,कुबडी, कॅलिफर,वाकर,व्हीलचेअर,आदीचे मोजमाप व नावनोंदणी करून लाभ मिळाला.
मिंडा ग्रुपचे निलेश पवळे, मिंडा ग्रुपच्या डॉ.मृणाली मॅडम यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी महापौर नितीन काळजे,भारतीय जनता पार्टी चे शहर कोषाध्यक्ष सचिन भाऊ तापकीर,संघटनेचे अध्यक्ष,दत्ता भोसले,उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, रामचंद्र तांबे,अशोक भोपळे,सागर सुफल,स्मिता सस्ते,करण नागे,प्रशांत नागे,आशा माने व अन्य सभासद यांचे उपस्थित होते.