Saturday, May 18, 2024
HomeNewsPCMC:रोटरी क्लब निगडीकडून झेव्हियर दांपत्याचा गौरव

PCMC:रोटरी क्लब निगडीकडून झेव्हियर दांपत्याचा गौरव

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणेच्या वतीने भारतीय निर्वासितांसाठी कार्य करणारे सौ.फ्लोरिना झेवियर आणि अशोक झेवियर यांना शांतता भवन पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी रोटरी इंटरनॅशनल संचालक (फिनलंड) माजी प्रांतपाल विरपी होंकला यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पीस डायरेक्टर प्रशांत खानखोजे,रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष हरबिंदर सिंग,प्रथम महिला कमलजीत कौर,व्होकेशनल चेअरमन गौतम दोशी, राकेश सिंघानिया,जगमोहन भुर्जी आदी मान्यवर
उपस्थित होते.

झेव्हियर दांपत्य हे श्रीलंका,अफगाणिस्तान आणि भारतातील निर्वासितांसोबत कार्य करत आहेत. त्यांनी निर्वासितांना केवळ महत्त्वाचा पाठिंबाच दिला नाही तर समाजात आशा आणि लवचिकता निर्माण करण्यातही ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.फ्लोरिना झेवियर यांनी गंभीर विषयांवर खुली चर्चा करून आणि लोकांमध्ये शांतता जागरुकता पसरवून सदस्यांना समृद्ध केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय