Thursday, December 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पर्यावरण दिनी ७ हजार झाडे लावणार, शंकर जगताप (BJP) यांचा...

PCMC : पर्यावरण दिनी ७ हजार झाडे लावणार, शंकर जगताप (BJP) यांचा संकल्प

भाजपाचे १४५० बुथप्रमुख प्रत्येकी पाच झाडांची लागवड करून दत्तक घेणार PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवडकरांच्या अवतीभवती सदा वृक्षराजी बहरलेली असावी, यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) बुधवारी ५ जून रोजी शहरात ७ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. tree plantation

पक्षाच्या प्रत्येक बुथ प्रमुखाच्या माध्यमातून त्या त्या भागात पाच झाडांची लागवड करण्यात येणार आहे. शहरात शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, उंबर यांसारख्या देशी झाडांची लागवड करून ते दत्तक घेणार आहेत, अशी माहिती शंकर जगताप यांनी दिली.

जल, जमीन आणि जंगल हे पर्यावरणाचे कान, नाक आणि डोळे आहेत. यापैकी कोणत्याही घटकाला झालेली इजा पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड व मिथेन या वायूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पर्यावरण ही आज जगासमोरील ज्वलंत समस्या बनली आहे.

निसर्ग संपत्तीचा ऱ्हास, पर्यावरण ऱ्हास, महापूर, चक्रीवादळे, दुष्काळ, जंगलातील वनवे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील होणारी वाढ, ऋतुचक्रातील बदल, विविध प्रकारची महामारी अशा भयानक संकटांनी अनेक वनस्पती, पशु-पक्षी यांच्या जाती नष्ट होत असून, त्याची भयानकता मानवाच्या अस्तित्वावरही घाला घालत आहे. pcmc

सुमारे पाच वर्षापूर्वी कोव्हीड-१९ चा विषाणूने अफाट बुद्धिमान, हुशार आणि शक्तिशाली असलेल्या मानवाला घरात बंदिस्त केले. रात्रंदिवस धावणाऱ्या जगाला कोरोनाने स्तब्ध करून ठेवले. या महामारीने समस्त जगासाठी एक स्पष्ट संदेश दिला आहे. तो मानवाने समजून घेऊन, आपल्या वृत्तीत आणि कृतीत सुधारणा करणे वर्तमानाची गरज व भविष्याची मागणी आहे. या निसर्गाची ‘इकोसिस्टीम’ पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा संकल्प गरजेचा आहे. pcmc

त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवारी संपूर्ण शहरात ७ हजारहून अधिक झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले. pcmc

शहरात भाजपचे १ हजार ४५० बुथप्रमुख आहेत. या प्रत्येक बुथप्रमुखामार्फत त्या त्या भागात प्रत्येकी पाच झाडांची लागवड केली जाणार आहे. शहरात शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी फक्त देशी झाडांचीच लागवड करण्यात येणार आहेत. Tree plantation in pcmc

त्यामध्ये वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, उंबर यांसह अन्य देशी झाडांचा समावेश असणार आहे. हवा शुद्ध करून ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढविण्यामध्ये देशी झाडांचा उपयोग होतो. त्यामुळे सर्व बुथप्रमुखांमार्फत देशी झाडेच लावण्यात येणार आहेत. तसेच या झाडांची लागवड करून बुथप्रमुखच ते दत्तक घेऊन संगोपन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

‘गाढवाचं लग्न’ मधील लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

मत्स्यव्यवसाय विभागात भरती, पगार 2 लाखांपर्यत

सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

दुचाकीत साडीचा पदर अडकून पुण्यातील महिलेचा मृत्यु

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

संबंधित लेख

लोकप्रिय