Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार समिती व शिव सह्याद्री ढोल पथकाच्या वतीने...

PCMC:पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार समिती व शिव सह्याद्री ढोल पथकाच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:मनःशांती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार समिती व शिव सह्याद्री ढोल पथकाच्या वतीने पिंपळे गुरव येथे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात सातशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.
           या शिबिरामध्ये सर्जरी, मेडीसिन, बालरोग, अस्थिरोग, स्री रोग, आयुर्वेद व पंचकर्म या संदर्भातील विविध आजार, व्याधी याबाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. एक्स रे, रक्त लघवी, सोनोग्राफी, कलोनोग्राफी, गॅस्ट्रॉसकॉपी, इसीजी, सिटी स्कॅन आदी तपासण्या करण्यात आल्या.


          यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरूण पवार, आयोजक प्रा.विष्णू शेळके, सह्याद्री ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी.बी.घोडे, उपनिबंधक सुदाम चपटे, नुमवी पर्यवेक्षक देवराम चपटे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धावजी साबळे आदी उपस्थित होते.
         शिबिरात डॉ.धीरज जंगले, डॉ. विराग  कुलकर्णी, डॉ.शुभांगी करंजे, डॉ.मंजिरी जोशी, डॉ.केतन जंगले या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासण्या व मार्गदर्शन केले.
       शिबिराच्या आयोजनात राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जमाती सेल पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विष्णू शेळके व महिला सरचिटणीस सुनिता कोळप यांनी पुढाकार घेतला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुशिला डिसुझा,रुपाली लांडे,सिद्धी शेळके,प्रज्ज्वल कांबळे,श्रेया वरे,अंकिता दाते, वैष्णवी कराळे यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय