पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरीच्या वतीने आरसी कम्युनिटी हॉल चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रीन फॅक्टरी या विषयावर परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (PCMC)
सेमिनार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल शीतल शहा होते. सेमिनारची सुरुवात अध्यक्ष प्रशांत शेजवळ यांनी त्यांचे मनोगतद्वारे केली. त्यानंतर प्रांतपाल शीतल शहा यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी एनर्जी इफिशीयन्सी वर जयदीप मालवीय, नेट झिरोवर अदिती, महेश देवधर आणि ग्रीन सर्टीफिकेशन वर केशव ताम्हणकर यांनी आपले विचार मांडले.त्यानंतर उपस्थित असलेल्यांसाठी प्रश्नोत्तरे कार्यक्रम घेण्यात आला.त्यावर संबंधित विषय तज्ञांनी उत्तरे दिली. परिसंवादामध्ये राजेंद्रकुमार सराफ, प्रांतीय पर्यावरण विभाग संचालक वसंत माळुंजकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष, सदस्य व एम.एस.एम. ई.कंपन्यांचे डायरेक्टर/ प्रतिनिधी उपस्थित होते.
सेमिनार करिता रोटरी क्लब थेरगाव, रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलीट व रोटरी क्लब ऑफ कॉस्मोपॉलिटन यांचे विशेष सहकार्य लाभले. (PCMC) कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीनिवास कोरे यांनी केले.
हे ही वाचा :
सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती
जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन
मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी
धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप
परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी