Wednesday, December 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : नागरी समस्या समजून घेण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदार संघात संवाद यात्रा...

PCMC : नागरी समस्या समजून घेण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदार संघात संवाद यात्रा (Mayur Jadhav)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) विभागाच्या वतीने शहराध्यक्ष मयूर जाधव यांनी दर रविवारी पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुरू केलेल्या संवाद यात्रेचा दुसरा रविवारची पदयात्रा दापोडी येथे सुरू झाली. (pcmc)

येथील नेहरू चौकातील शहीद भगतसिंग पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे महात्मा फुले नगर, आत्तार वीटभट्टी, एसएमएस कॉलनी, पवार वस्ती, गुलाब नगर, जय भीम नगर अशी मार्गक्रमण करत तानाजी मालुसरे स्मारकाजवळ यात्रेची सांगता झाली. (pcmc)

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे उपस्थित होते, त्यांनी आपल्या मनोगतात पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये सामान्य नागरिकांना पडणाऱ्या अडचणी, अनेक प्रलंबित काम यासोबतच विद्यार्थी, तरुण, महिला, कामगार, कष्टकरी छोटा दुकानदार, व्यापारी या सगळ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत नागरिकांची संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह घरोघरी पोचवण्यासाठी संवाद यात्रा खूप चांगले माध्यम ठरत आहे. (pcmc)

शरद पवार यांच्या विषयी लोकांची आत्मीयता, एकनिष्ठेची, भावना सर्वत्र दिसून येत आहे, यावेळी शहरातील पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व सोबत सामान्य नागरिक देखील या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. (pcmc)

यावेळी शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे सामाजिक न्याय पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र यादव प्रदेश सरचिटणीस रतन भंडारी विवेक विधाते, अजिनाथ सकट, सचिन सकाटे, आकाश शिंदे,अजय कांबळे, हसीना सय्यद, शहानवाज, सुभाष गालफाडे, अनिल गायकवाड, सागर राजगुरू, सुनील कांबळे, राजू आवळे, संतोष नेटके, अविनाश शिंदे, अमर उदमले, विनय भाट, रोहित जाधव, कृष्णा वाघमारे, सतीश राजगुरू, देशमुख साहेब उपस्थित होते. (pcmc)

पिंपरी विधानसभेसाठी कार्यक्षम आमदार देण्यासाठी जनसंवाद

संवाद पदयात्रेचे आयोजक सामाजिक न्याय विभागाचे वतीने दर रविवारी पिंपरी विधानसभेतील कार्यक्षेत्रामध्ये ही यात्रा अशाच पद्धतीने मार्गक्रमण करीत नागरिकांच्या समस्या अडचणी समजून घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी पिंपरी विधानसभेसाठी कार्यक्षम आमदार देण्यासाठी जनसंवाद यात्रा सुरू आहे, असे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष मयूर जाधव यांनी सांगितले.

सर्व उपस्थितांचे स्वागत व आभार मानून पदयात्रेचा समारोप झाला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, केल्या ‘या’ घोषणा

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर

गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ

मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

संबंधित लेख

लोकप्रिय