पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.१७ – प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुवनेश्वर, ओडिसा येथे आज प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उभारण्यात आलेल्या देशातील ४ लाख सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने च-होली येथे उभारण्यात आलेल्या सदनिकांची ताबा पावती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर आणि आमदार उमा खापरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना देण्यात आली. (PCMC)
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमास उपआयुक्त आण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सह शहर अभियंता काळे, कार्यकारी अभियंता अनघा पाठक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे , उज्वला गोडसे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. (PCMC)
यावेळी भुवनेश्वर येथील सदनिका हस्तांतरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण या कार्यक्रमात सुरू होते. देशातील ३० लाख कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आली असून त्यापैकी २६ लाख घरे ही ग्रामीण भागात देण्यात आली आहेत तर ४ लाख घरे ही शहरी भागात कुटुंबांना वाटप करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.
दरम्यान महापालिकेच्या वतीने भारतीदेवी विजय चव्हाण, सखाराम नामदेव केंगले, ललिता रामानंद मठपती, अनंत नथुराम भोसतेकर, रेणू रामलाल प्रजापती, शितल खुशाल शेटे, सुजित अशोक बैंगीरे, जीवन नारायण डेंगळे, मीना अंकुश डामसे, सिमरन फैयाज तांबोळी, योगिता ढाकरे या लाभार्थ्यांना च-होली येथील सदनिकांची ताबा पावती देण्यात आली.
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती