Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा युवाना वेलनेस कोहेसिव्ह केअर एलएलपी समवेत करार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयु) स्कूल ऑफ सायन्सेसने शुक्रवारी युवाना वेलनेस कोहेसिव्ह केअर एलएलपी सोबत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात केला. (PCMC)

---Advertisement---

युवाना वेलनेस ही संस्था संस्थापक, संचालक अदिती कुलकर्णी आणि सहसंस्थापक कुणाल खनाडे यांच्या नेतृत्वाखाली विविध रुग्णालये आणि कॉर्पोरेट्सना मानसोपचार आणि सायकोमेट्रिक सेवा प्रदान करते.

यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, स्कूल ऑफ सायन्सेसच्या विभाग प्रमुख प्रा. रुचू कुथियाला आदी उपस्थित होते. pcmc

पीसीयु स्कूल ऑफ सायन्सेस मधील वेलनेस, क्लिनिकल सायकोलॉजी आणि संबंधित प्रकल्पांमधील अग्रगण्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी साठी हा करार उपयुक्त ठरेल असे मत विभाग प्रमुख प्रा. रुचू कुथियाला यांनी व्यक्त केले.

हे विशेष अभ्यासक्रम हेल्थकेअर उद्योगाच्या विकसित होत असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण अनुभव आणि करिअरच्या संधी प्रदान करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केले जातील या करारासाठी प्रा. सन्निध्या मिसाळ यानी पुढाकार घेतला. pcmc

युवाना वेलनेस कोहेसिव्ह केअर एलएलपी सोबतच्या शैक्षणिक करारामुळे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी होऊन वर्गातील शिकवण्यापासून अनुभवात्मक शिक्षणाकडे जाण्यास मदत करेल आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल असे डॉ. मणीमाला पुरी यांनी सांगितले. pcmc

युवाना तज्ञांबरोबर सह-शिक्षण, प्रशिक्षण तसेच संयुक्त प्रकल्प राबवले जातील डॉ. सुदीप थेपाडे यांनी सांगितले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट

कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर

मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात

---Advertisement---

ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब

मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !

ब्रेकिंग : निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) यांच्यावर प्राण घातक हल्ला, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles