Thursday, December 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महापालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त...

PCMC : महापालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – स्त्री शिक्षण, समानता आणि सत्यासाठी आपले आयुष्य व्यतीत करणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले हे भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचे प्रणेते मानले जातात, त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करून अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रगत विचारांचा वारसा सर्वांनी जोपासावा असे मत व्यक्त केले. (PCMC)

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामधील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उद्यान अधिक्षक योगेश वाळूंज, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आणि विचार प्रबोधन पर्व येथील कार्यक्रमास माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, हिरामण भुजबळ, रामभाऊ दरवडे, तुकाराम गायकवाड, विलास लोंढे, किरण लोंढे, शेखर वाघ, प्रदीप पवार, संतोष सोनवणे चंद्रवदन बगाडे, कविता खराडे, रचना गायकवाड, जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे ,किसन केंगळे, अभिजीत डोळस, विकास गायकांबळे, आणि सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय