Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार बूथ प्रमुखांचा मेळावा

PCMC : राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार बूथ प्रमुखांचा मेळावा

युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांचे शक्तिप्रदर्शन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) (PCMC) आयोजित बूथ प्रमुख संवाद मेळावा युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात भोसरी येथील क्वालिटी सर्कल हॉल येथे पार पडला.

पक्ष फुटी नंतर मोठ्या संख्येने नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी शरदचंद्र पवार यांना सोडून गेल्यानंतर देखील प्रतिकूल परिस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील भोसरी विधानसभेतील 464 बूथ कमिटीची संपूर्ण बांधणी करण्यात आली आहे, यावेळी भोसरी विधानसभेतील बूथ अध्यक्ष यांना प्रशिक्षण देण्यात आले. पक्ष आजही ताकदीने उभा आहे,असे इम्रान शेख यांनी सांगितले. PCMC NEWS


यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना ईडी, सीबीआयच्या बंदुकीच्या धाकावर भाजपात घेणाच्या राक्षसी प्रवृत्ती विरुद्ध तसेच महागाई, स्त्रियांवरील अत्याचार,जातीयवाद, बेरोजगारी या प्रमुख मुद्द्यासहित पुणे जिल्ह्यातील उद्योगाचे गुजरातला स्थलांतर यामुळे नाराज जनता भाजपला पराभूत करणार आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकीत लोक शरदच पवार यांच्या पाठीशी उभे राहतील, भोसरी विधानसभेतील मायबाप जनता खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांना सर्वाधिक मताधिक्य देणार आहे असेही ते म्हणाले. PCMC NEWS

निरीक्षक प्रकाश म्हस्के म्हणाले, “सर्वसामान्य कार्यकर्ता आणि मतदार हा फक्त आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सोबतच आहे. युवक अध्यक्ष इम्रान शेख,महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर आणि सहकाऱ्यांनी भोसरी विधानसभेत इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या संख्येने बूथ अध्यक्षांचा मेळावा आयोजित केला आहे.केले. शिरूर लोकसभा मतदार संघातील (Shirur loksabha) भोसरी विधानसभेतून सर्वाधिक मताधिक्य अमोल कोल्हे (Amol kolhe) यांना मिळेल यात शंका नाही असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे म्हणाले “९ वर्षाच्या असफल सत्तेच्या उपभोगानंतर राज्यात केलेल्या प्रत्येक सर्वेत भाजप पिछाडीवर असल्याचे रिपोर्ट होते. म्हणून भाजपने फोडाफोडीचे राजकारण केले, महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनता या गद्दारीला सहन करणार नाही.सर्वात जास्त उमेदवार महविकास आघाडीचे विजयी होतील.
वैद्यकीय सेल प्रदेशाध्यक्ष गौतम आगा उपस्थित होते.PCMC NEWS

या मेळाव्यास विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे राज्य उपाध्यक्ष प्रकाश म्हस्के, युवक निरीक्षक तसेच वैद्यकीय सेल प्रदेशाध्यक्ष गौतम आगा, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, पुणे जिल्हा ग्रामीण युवक अध्यक्ष स्वप्निल भैय्या गायकवाड,सागर दादा कोल्हे, युवक शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर, वरिष्ठ नेते शिरीष जाधव, विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर, विशाल मुरलीधर जाधव, युवक विधानसभा अध्यक्ष संतोष शिंदे, युवक महिला अध्यक्ष सारिका हरगुडे, युवक पदाधिकारी रजनीकांत गायकवाड, मेघराज लोखंडे, ॲड अमोल गव्हाणे, असिफ शेख,अजय मालवदे, शकील शेख,रेखाताई मोरे,जयमाला कदम,ताहेरा सय्यद, हाजीमलंग शेख, बबिता बनसोडे व मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी महिला पदाधिकारी आदरणीय पवार साहेबांना मानणारे नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय