Tuesday, December 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आमदार महेश लांडगे यांच्यामुळे चिखली परिसराचा कायापालट!

PCMC : आमदार महेश लांडगे यांच्यामुळे चिखली परिसराचा कायापालट!

संतपीठ, टाऊन हॉल, रस्ते विकास, म्हणून आम्ही महेश लांडगे यांचे सोबत (PCMC)

चिखली, कुदळवाडीतील आपुलकीच्या गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिखलीत संतपीठ, टाऊन हॉल विकसित केला. देहू-आळंदीला जोडणारा समांतर रस्ता, चिखली आकुर्डी 18 मीटरचा रस्ता विकसित होत आहे. यामुळे चिखली परिसराचा कायापालट होत असून, ही कामे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच झाली आहेत. त्यामुळे आम्ही महेशदादांसोबत असल्याची ग्वाही चिखली, कुदळवाडीतील नागरिकांनी दिली. (PCMC)

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या आपुलकीच्या गाठीभेटींना चिखली, कुदळवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी ठिकठिकाणी आमदार लांडगे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी माजी महापौर राहुल जाधव, उपमहापौर शरद बो-हाडे यांच्यासह ग्रामस्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नेवाळे, मोरे, यादव, बालघरे, मळेकर, पवार, जाधव, व्यापारी, उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महिलांनी रांगोळ्या काढून स्वागत केले. चिखलीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन गाठीभेटींना सुरुवात झाली. हरघुडे वस्ती, नेवाळे वस्ती, कुदळवाडी परिसर फेरी काढली. (PCMC)

आमदार महेश लांडगे म्हणाले की, चिखली परिसरातील नागरिकांनी मला नेहमीच पाठबळ दिले. पहिल्या निवडणुकीपासून साथ दिली. लोकांना मी विसरू शकत नाही. या भागाचा विकास करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. रस्ते विकसित केले. टाऊन हॉल विकसित केला. या नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणी आणले आहे. या भागांतील विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

प्रतिक्रिया:

पिंपरी-चिंचवड शहराला जलस्त्रोतांमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी आंद्रा, भामा आसखेडमधून २६८ एमएलडी पाणी आरक्षण मंजूर केले. या प्रकल्पातील १०० एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झाले आहे. १६८ एमएलडी पाणी योजना प्रगतीपथावर आहे. जून- २०२५ मध्ये सदर पाणी शहरात दाखल होईल आणि समाविष्ट गावांचा आगामी २५ वर्षांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच, पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचा जैसे थे आदेश रद्द केला असून, मुळशी धरणातून ७५० एमएलडी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

संबंधित लेख

लोकप्रिय