Thursday, December 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचे सूक्ष्म नियोजन

PCMC : आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचे सूक्ष्म नियोजन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.१३ – आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणा-या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, यासाठी समन्वयाने सूक्ष्म नियोजन करून सर्वांनी आपली जबाबदारी चोख बजावून हा पालखी सोहळा आनंदीमय वातावरणात पार पाडण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी महापालिका प्रशासकीय यंत्रणेला दिले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड (pcmc) शहरात होणार आहे. जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची तसेच पालखी मार्गाची पाहणी करून आवश्यक सूचना संबधित अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी दिल्या. (Micro planning of Pimpri Chinchwad Municipal Corporation for Palkhi ceremony)


या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, निलेश भदाणे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सिताराम बहुरे, उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता गणेश देशपांडे, बाबासाहेब गलबले, दिलीप धुमाळ, राजेंद्र शिंदे, विनय ओहोळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. pcmc news

पालखी मार्गाची सुरुवात निगडी येथील भक्ती शक्ती येथून करण्यात येते याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्वागतकक्ष उभारला जातो. येथे करण्यात येणा-या व्यवस्थे बद्दलची माहिती जांभळे पाटील यांनी घेतली.

आकुर्डी येथील विठ्ठल मंदीरामध्ये जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम असतो. या ठिकाणची पाहणी देखील त्यांनी केली. आकुर्डी येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय येथे दिंड्यांचा मुक्काम असतो या शाळांची पाहणी देखील यावेळी करण्यात आली.

दिंड्यांच्या मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये तसेच इतर खाजगी ठिकाणी असतो तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविण्याच्या सूचना जांभळे पाटील (Pradeep Jambhale Patil) यांनी दिल्या. खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिनी मंदिर, नाशिक फाटा रोड, दापोडी येथील पालखी विसावा आदी ठिकाणी त्यांनी पाहणी केली. pcmc news

महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार असून त्याबाबत आवश्यक व्यवस्था करण्यात यावी. पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक आपत्ती व्यवस्थापन करावे, उघडी गटारे यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करावी, सर्व होर्डिंग्जची पाहणी करून योग्य कार्यवाही करावी, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावावेत, पालखी मार्गावर आवश्यक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करावी, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. pcmc

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केली.

यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, निलेश भदाणे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सिताराम बहुरे, उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता गणेश देशपांडे, बाबासाहेब गलबले, दिलीप धुमाळ, राजेंद्र शिंदे, विनय ओहोळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करावे, तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी आवश्यक ठिकाणी महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावी, पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरते शौचालयांची व्यवस्था करावी. तसेच स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य, उद्यान, शिक्षण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांनी आपसांत समन्वय ठेवून पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आवश्यक तयारी पूर्ण करावी अशा सूचना अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा

सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन

कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा

चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

संबंधित लेख

लोकप्रिय