Home पुणे - पिंपरी चिंचवड PCMC : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ध्वजारोहण व वृक्षारोपण

PCMC : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ध्वजारोहण व वृक्षारोपण

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पिंपरी कार्यालयाच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून वृक्ष मित्र अरूण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करून स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला.

शहीद जवानांना व इरशाळवाडीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून स्वातंत्र्य दिन साजरा केला. वृक्ष मित्र अरूण पवार यांच्या हस्ते आणि गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, जेष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के, अमोल लोंढे, गुणवंत कामगार किरण देशमुख, अल्फा लाव्हलचे कामगार प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

अण्णा जोगदंड यांनी राष्ट्रध्वजाची रचना पिंगळी व्यंकय्या यांनी 1921 मध्ये 30 देशाच्या राष्ट्रध्वजांचा सखोल अभ्यास करून केली. यामध्ये 1931 मध्ये संसदेत ठराव मंजूर करून लाल रंग काढून केशरी रंग दिला, अशोक चक्रात तिरंग्यात अशोक चक्राचा समावेश केल्याची माहिती उपस्थितीतांना दिली.

कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अरुण पवार यांचा कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक अनिल कारळे यांनी सन्मान केला. अरूण पवार यांनी उपस्थित गुणवंताना आणि जिल्हाधिकारी यांनी विशेष कार्यकारी आधिकारी नियुक्त झालेल्या गुणवंत कामगारांना मानवी हक्क कायद्याने पुस्तक व फुलं देऊन सन्मानित करण्यात केले. कामगार कल्याण कार्यालयासाठी 10 मोफत खुर्ची मोफत देण्यात येतील अशी घोषणा अरुण पवार यांनी केली.

केंद्र संचालक अनिल कारळे यांनी मंडळाच्या शिवण काम वर्ग, हस्तकला वर्ग, शिष्यवृत्ती योजना, पाठयपुस्तक योजना अशा अनेक कामगारासाठी व कुटुंबासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनाची माहिती दिली तर त्यांनी केंद्रात येऊन जास्तीत जास्त कामगारांनी कामगार कल्याण मंडळाचे सभासद होण्याची आव्हान ही केले. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी निवड केलेल्या गुणवंत कामगार संगीता जोगदंड,दत्तात्रय अवसरकर, मुल्ला नसरुद्दीन, शंकर नानेकर, किरण देशमुख, महेश मेस्त्री, ज्ञानेश्वर मलेशेट्टी, अशोक साठे, पांडुरंग दोडके, अंबादास दरवेशकर, चंद्रकांत लवाटे, शिवराम गवस, विकास कोरे, गुंगा क्षीरसागर, अण्णा गुरव, दत्तात्रय येळवंडे, सुधाकर खुडे तसेच सुदाम शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या सल्लागारपदी निवड झाल्यामुळे त्यांचाही यांचा सत्कार वृक्षमित्र अरुण पवार यांच्या हस्ते मानवी हक्क माहिती पुस्तक गौरविण्यात आले.

गुणवंत कामगार शामराव गायकवाड, पंडित वनसकर, विश्वास चिलमे, प्रताप देवडकर, कवी प्रताप देवडकर, संजय चव्हाण, चंद्रकांत भालेकर, किरण कोळेकर, वृक्षमित्र अरुण पवार, गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, गुणवंत कामगार संगिता जोगदंड, जेष्ट पत्रकार व गुणवंत कामगार शिवाजीराव शिर्के, केंद्र संचालक अनिल कारळे, केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे, संगिता क्षीरसागर, ह.भ.प.शामराव गायकवाड, शंकर नानेकर, गुणवंत कामगार प्रतिनिधी व गुणवंत कामगार किरण कोळेकर, शैलेजा आवडे सह अनेक कामगार उपस्थित होते.

अण्णा जोगदंड यांनी सुत्रसंचालन केले तर अनिल कारळे यांनी आभार मानले.

Exit mobile version