Saturday, June 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अधिक मासाच्या पुरुषोत्तम पर्वकाळात नेत्रहीन मुलांना स्नेहभोजन

PCMC : अधिक मासाच्या पुरुषोत्तम पर्वकाळात नेत्रहीन मुलांना स्नेहभोजन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपळे गुरव येथील ममता अंध :कल्याण केंद्रात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेल्या 40 विशेष मुलांना अधिक मास महीन्या निमित्त स्नेहभोजन देऊन त्यांचा आनंद द्विगणित करण्यात आला .आमच्या मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या माध्यमातून अनेक वेळा वेगवेगळ्या अनाश्रमात व वृद्धाश्रमातही मदत केली जाते .संस्थेच्या महिला शहराध्यक्षा सौ मीना करंजवणे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून नेहमीच मदत करत असतात, त्यांनी स्नेहभोजनासाठी मदत केल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले . सामाजिक कार्यकर्ते सचिन करांजावणे गेल्या सहा महिन्यापासून प्रत्येक महिन्याला दोन गॅस सिलेंडर मोफत ममता अंध: कल्याण केंद्रात देतात आणि यापुढे ही ते देणार असल्याचे केंद्र चालक तुषार कांबळे यांनी सांगितले.



शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की,आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे आणि ते आपण दिले पाहिजे या उदात्त भावनेतून प्रत्येक नागरिकांनी आपापल्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून खारीचा वाटा उचलून गरजूंना मदत केली पाहिजे. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हालाही समाधान वाटले, विशेष मुलांनी भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे ते त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले, यावेळी आम्ही सर्वजण पदाधिकारी यांनी स्नेहभोजन विशेष मुलाबरोबर जेवण केले आणि  आम्हाला ही खूप आनंद झाला.

यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महिला शहराध्यक्षा मिना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड ,सहसचिव गजानन धाराशिवकर आळंदी उपाध्यक्ष पंडित वनसकर, केंद्रचालक तुषार कांबळे, देशमुख मीराबाई सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय