Sunday, May 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:लायन्स क्लबच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे मोशीत उदघाटन

PCMC:लायन्स क्लबच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे मोशीत उदघाटन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: राजस्थान रणजी क्रिकेट टीम चे माजी कर्णधार कैलाश गट्टानी यांच्या सन्मानार्थ लायन्स क्लब ऑफ तळवडे प्राइडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५० वर्षावरील पुरुषांसाठी क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र रणजी खेळाडू निवड समितीचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राजस्थान माजी रणजीपटू कैलास गट्टाणी, प्रांतपाल विजय भंडारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्याम खंडेलवाल,कॅबिनेटसेक्रेटरी अशोक मिस्तरी,खजिनदार राजेंद्र गोयल, सुनील चेकर, धनराज मंगनाणी, लायन्स क्लब तळवडे प्राईडचे अध्यक्ष कैलाश पारीख, क्रिकेट स्पर्धा समन्वयक विजय अगरवाल,क्रीडा संचालक शिरीष भोपे,सुधीर फाळके,प्रांतीय क्रीडा संचालक वसंत कोकणे, युवराज पाटील,संदीप गुप्ता, डॉ अशोक अगरवाल आदी उपस्थित होते.

4 जानेवारी रोजी नवीन उदयोन्मुख खेळाडू चा सत्कार करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेमध्ये पुणे,पिंपरी चिंचवड,पनवेल आणि नागपूर येथील खेळाडू सहभागी झालेले आहेत.
सदर स्पर्धेत मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक,उत्कृष्ट फील्डर, फायटर ऑफ मॅच आणि प्रत्येक सामन्याचा सामनावीर अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.
या स्पर्धेत चार संघात लढत होणार असून चारही संघाना त्यांच्या स्पर्धेतील रॅंकिंग प्रमाणे ट्रॉफी देण्यात येणार आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात उत्तम आरोग्य ही एक देणगी आहे आणि उत्तम आरोग्य असण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार अत्यंत गरजेचा आहे. वयाचे बंधन न बाळगता ५० वर्षावरील हे सर्व खेळाडू पुढील तीन दिवस स्पर्धात्मक क्रिकेटचा आनंद घेणार आहेत.


स्कोअर पुढीलप्रमाणे
उदघाटनानंतर पहिला सामना बिकेसी लायन विरुद्ध लवास रॉयल या संघात पार पडला. नाणेफेक जिंकून लवास रॉयल संघाने प्रथम गोलंदाजी केली. बिकेसी लायन संघाने प्रथम फलंदाजी करून ६ बाद १६२ धावा केल्या यामध्ये अविनाश तिकोने ४०(२२), शिरीष भोपे ३५(३०) आणि वसंत कोंकणे २६(२५) यांचा सहभाग होता. प्रत्युत्तरात लवास रॉयल संघाने हे आव्हान १९.३ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले , यांमध्ये सुनील मानधन ४२(२७),विक्रम खेयया ३६(३०) आणि प्रीतम खयया २८(१७) यांचा प्रमुख सहभाग होता. मन ऑफ द मॅच किताब प्रीतम खयया यांना आणि फायटर ऑफ द मॅच हा किताब अविनाश तिकोने यांना देण्यात आला. बिकेसी लायन संघाच्या गोलंदाजीत कैलाश पारिख २ आणि देवेंद्र ,शिरीष,अविनाश यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.लवास रॉयल संघाच्या गोलंदाजीत रतन,किरीट, उत्कर्ष, प्रीतम आणि दिलीप यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.
दूसरा सामना बाश्री रॉयल आणि ओम व्हीसीसीए नागपूर या संघात झाला या सामन्यात नागपूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना बाश्री रॉयल संघाने २० षटकात ११ बाद ९५ धावा केल्या, यामध्ये प्रदीप क्षीरसागर ३ षटकात १९ धावा देवून ४ गडी बाद केले.सुनील मेश्राम ३ षटकात ६ धावा देवून २ गडी आणि अनंत नारले याने ४ षटकांत १५ धावा देवून २ गडी बाद केले , आशीष आणि संदीप यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात नागपूर संघाचे ९२ धावात सर्व गडी बाद झाले आणि हा अटीतटीचा सामना बाश्री रॉयल संघाने ३ धावाने जिंकला. बाश्री रॉयल संघाकडून मनोहर पाटील ४ षटकांत १५ धावा देवून ३ गडी,भूषण देशपांडे ४ षटकांत १८ धावा देवून ३ गडी बाद,अनिल मांडके ३ षटकांत १५ धावा देवून २ गडी बाद केले.मनोहर पाटील याला मॅन ऑफ द मॅच आणि प्रदीप क्षीरसागर याला फायटर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दि.०३.०१.२०२४ पहिला सामना लवास रॉयल आणि बाश्री रॉयल या संघात होईल आणि दूसरा सामना ओम व्हीसीसीए नागपूर विरुद्ध बिकेसी लायन या संघांमध्ये होईल.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय