Friday, October 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : संस्कृती संवर्धन भजन महासंघाच्या भजन महोत्सवास मोठा प्रतिसाद!

PCMC : संस्कृती संवर्धन भजन महासंघाच्या भजन महोत्सवास मोठा प्रतिसाद!

पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : श्रीक्षेत्र आळंदी आणि श्रीक्षेत्र देहू या तीर्थक्षेत्रांच्या सानिध्यात असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भजन महोत्सवाचा ‘निनाद’ ऐकायला मिळावा. वारकरी आणि अध्यात्मिक सांप्रदायाचा वारसा असलेल्या शहरामध्ये हे सादरीकरण भक्तीभय वातावरणात निर्माण करीत आहे. आषाढ मासानिमित्त ९ ते११जुलै दरम्यान संस्कृती संवर्धन भजन महासंघ, निगडीच्या वतीने भव्य भजन सादरीकरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. (Pcmc)

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ अंतर्गत संस्कृती संवर्धन भजन महासंघाच्या प्राधिकरण व चिखली विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भजन सादरीकरण महोत्सवाचे आयोजन केले होते.

यात ४६ भजनी मंडळाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या महोत्सवात भजन, गवळण आणि भक्तिसंगीत शुद्ध स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळाले. संस्कृती आणि भक्ती संगीताचा उत्साह द्विगुणीत व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. (Pcmc)

हिंदु संस्कृतीमधील सण व उत्सवाची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी शाळेमध्ये, गृहरचना संस्थेत विविध सण उत्सव साजरे करण्यात यावे. मुला-मुलींचेही भजनी मंडळ तयार व्हावे त्यातून भजनाचा वारसा पुढे नेता येईल असे महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. अजित जगताप यांनी महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले. (Pcmc)

हा उत्सव म्हणजे संगीत आणि अध्यात्म यांच्यातील गहन संबंधाचा उत्सव आहे. या मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रवासात प्रेक्षकांमध्ये दीर्घकाळ गुंजत राहील, अशा संगीताद्वारे आध्यात्मिक स्पंदने निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.

अपवादात्मक प्रतिभावान कलाकारांची एक श्रेणी सादर करताना आम्हाला आनंद होत आहे आणि त्यांचे सादरीकरण तुम्हाला प्रगल्भ अध्यात्मिक प्रबोधन आणि संगीतमय आनंदाच्या क्षेत्रात नेण्याचे वचन देतात,” असे महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांनी समारोप प्रसंगी सांगितले.

भजन प्रेमी यांना एकत्र करून तीन दिवस एकत्र पणे नामस्मरण, सादरीकरण व एकोप्याने विचार विनिमय एवढाच उदात्त हेतू ठेऊन हा कार्यक्रम ठेवला होता. पिंपरी चिंचवड शहरातील भजन मंडळी व आयोजक मंडळी यांच्यात समन्वय व संपर्क साधावा व त्यातून भारतीय संस्कृतीचा संवर्धन व विकास व्हावा असा उदात्त हेतूने उत्सव साजरा करीत असतो. इतर परिसरातील भजनी मंडळांनी संपर्क करावा, असे सचिव शिवानंद चौगुले यांनी सांगितले. (Pcmc)

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती कानेटकर, माधुरी ओक, अर्चना सोनार, मनीषा मुळे, चंद्रशेखर जोशी व महासंघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले. प्रसंगी रवी कळंबकर, सरिताताई साने, श्री गुरुदत्त सेवा मंडळ, समृद्धी मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये

धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !

भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!

Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरत

संबंधित लेख

लोकप्रिय