भाजपा आमदार महेश लांडगे यांची माहिती
केंद्र सरकारची यशोगाथा जनजागृतीचा संकल्प
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या १० वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड गतीने विकास केला आहे. गरीब कल्याण, महिला सशक्तीकरण, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा आदी अनेक मुद्यांवर सरकारची कामगिरी लक्षवेधी आहे.त्यामुळे जगभरात भारताचे नाव उंचावले आहे.ही यशोगाथा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘गाव चलो अभियान’ सुरू केले आहे. हे अभियान पं. दीनदयाळ उपाध्याय यांना समर्पित करण्यात आले आहे,अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘गाव चलो अभियान’ ची आढावा बैठक घेण्यात आली.‘‘घर घर पहुंचाएंगे मोदी का संदेश,आगे बढेगा गाव, आगे बढेगा देश..’’ अशी घोषणा यानिमित्ताने करण्यात आली आहे.
यावेळी शिरूर लोकसभा विस्तारक श्रीकृष्ण देशमुख,संयोजक दक्षिण भारतीय आघाडी, महाराष्ट्र प्रदेश राजेश पिल्ले,जिल्हा सरचिटणीस शैला मोळक,मंडळ अध्यक्ष रवींद्र नांदुरकर,संतोष तापकीर,माजी महापौर राहुल जाधव,स्थायी समिती माजी अध्यक्ष ऍड.नितीन लांडगे व संतोष लोंढे,जिल्हा उपाध्यक्ष आशा काळे,चिटणीस राजश्री जयभाय,गीता महेंद्र, हिला आघाडी प्रदेश चिटणीस कविताताई हिंगे व वीणा सोनवलकर तसेच उद्योजक सुरेशतात्या म्हेत्रे भोसरी विधानसभेतील सर्व माजी नगरसेवक व नगरसेविका,भाजपा शहर पदाधिकारी,मंडल अध्यक्ष व मंडल पदाधिकारी, सर्व वॉरियर्स, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक पिंपरी-चिंचवड जिल्हा सरचिटणीस अजय पाताडे यांनी केले. प्रास्ताविक पिंपरी चिंचवड जिल्हा सरचिटणीस अजय पाताडे यांनी केले. अभियानाची माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस व अभियानाचे संयोजक विलास मडिगेरी व भोसरी विधानसभा सहसंयोजक पोपट हजारे यांनी दिली. भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रतिक्रिया :
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली दि.४ ते ११ फेब्रुवारी या काळात हे अभियान राबवण्यात येत आहे.या अभियानामध्ये ७ लाख खेड्यांमधील बूथवर भाजपा पक्ष कार्यकर्ते आठवडाभर जनजागृती करणार आहेत.या माध्यमातून मोदी सरकर आणि भाजपा प्रणित राज्य सरकारच्या विविध लोकपयोगी योजना,विकासकामे आणि कामगिरी याबाबत लोकांना माहिती देण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे अभियान निर्णायक ठरणार आहे. त्यादृष्टीने आम्ही नियोजनबद्ध काम करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.