आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांचे सुपुत्र गिरीराज सावंत यांचा पुढाकार (PCMC)
पिंपरी चिंचवड / कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले आमदार शंकर जगताप यांचा गिरीराज सावंत यांच्या हस्ते 50 हजार वह्या देऊन सत्कार करण्यात आला. (PCMC)
आमदार शंकर यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल सत्कार करण्यात आला. यासाठी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे सुपुत्र आणि कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गिरीराज सावंत यांनी पुढाकार घेतला.
यावेळी चिंचवड विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व कामगिरी करून प्रचंड मतांनी विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार श्री जगताप यांच्या कार्याचा गौरव केला.
आ. शंकर जगताप यांनी विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी हार तुरे न आणता, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य भेट द्यावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गिरीराज सावंत यांनी 50 हजार वह्या दिल्या.
या प्रसंगी चंद्रकांत सरडे, नरेश कदम, सुनिल अभंग, शरदराव जाधव, उमाकांत कुलकर्णी, नितिन कुलकर्णी, हिराशेठ सोनवणे, श्रीकांत चौधरी, आप्पा माचुत्रे, सागर खुटवड, मंगेश भोसले, अतिष जाधव सह अमर देशमुख यांच्यासह कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे ही वाचा :
मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी
गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार
डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…
NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती