पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते मित्र परिवार आयोजित अन्न वितरण सोहळा आयोजित करण्यात आला यामध्ये कष्टकरी कामगारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झेंडा वंदन, महापुरुषांना अभिवादन आणि अन्न वितरण आयोजित करण्यात आले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, इरफान चौधरी, किरण साडेकर, उमेश डोर्ले, सलीम डांगे, सिद्धनाथ देशमुख, हरी भोई, मनोज यादव, आबा शेलार आदी उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले की, ब्रिटिशाच्या जुलमी राजवटीतून हा देश स्वतंत्र करण्यात ज्या ज्या क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आपला देश सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी विविधतेतून एकता साधत एकोप्याने प्रगती करत आहे. यामध्ये कामगारांचे योगदान वाखानण्याजोगे आहे. मात्र, त्यांना आजही हक्कासाठी झगडावे लागत आहे.