Tuesday, December 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पोलीस आयुक्तालयामार्फत मोरया पुरस्काराचे परीक्षण

PCMC : पोलीस आयुक्तालयामार्फत मोरया पुरस्काराचे परीक्षण

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून विशिष्ट नियमांच्या अधिन राहून मूलभूत निकष पूर्ण करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना मोरया पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. (PCMC)

मोरया पुरस्कारासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटराव पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध गणेश मंडळांची परीक्षणे करण्यात आली.

गणेशोत्सव साजरा करत असताना मंडळांनी आवश्यक परवानग्या सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला नाविन्यपूर्ण संदेश देणारे उपक्रम डीजे ऐवजी परंपरागत वाद्यांचा वापर विसर्जन मिरवणुकीसाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले आहे का तसेच वैशिष्ट्यपूर्ण जनजागृतीचे संदेश याला प्राधान्य दिले आहे का ? या बाबींना परीक्षण करत असताना प्राधान्य दिले गेले. (PCMC)


पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून मोरया पुरस्कारासाठी पोलिस ठाणे आणि झोन लेव्हल वरून गणेश मंडळांची यादी आयुक्तालयास प्राप्त झाली व त्यानंतर आयुक्तालयाच्या परीक्षण समितीमार्फत संबंधित गणेश मंडळांचे परीक्षण करण्यात आले.

यावेळी घालून दिलेल्या सर्व निकषांची पूर्तता केली आहे का? याला विशेषत्वाने प्राधान्य दिले गेले

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणण्याची संकल्पना लोकमान्य टिळकांनी आणलेली आहे. असा हा गणेशोत्सव नेहमीच शांततापुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबध्द आहे.

श्री मोरया पुरस्कार समितीला वेळोवेळी अतिरिक्त आयुक्त वसंतराव परदेशी तसेच संबंधित पोलिस उपायुक्त आणि आयुक्तालयातील समन्वयक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड या प्रमुख वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळाले. (PCMC)

अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंतराव परदेशी यांनी आयुक्तालय पातळीवरील समितीचा दैनंदिन आढावा घेतला आणि मार्गदर्शन केले . सार्वजनिक गणेशोस्तव मंडळांनी एखाद्या गरीब विद्यार्थ्यास दत्तक घ्यावे अथवा गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी अशा प्रकारची जागृती करण्यात आली.

श्री मोरया पुरस्कारासाठी गणपती मंडळाचे परीक्षण करणे कामी आलेल्या सदस्यांचे, पोलीस स्टेशन स्तरावरील श्री मोरया पुरस्कार समिती सदस्यांचे व परिमंडळ स्तरावरील श्री मोरया पुरस्कार समिती सदस्यांचे आणि श्री मोरया पुरस्कार समितींना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व वरिष्ठ अधिकारी या सर्वांचे चिंचवडगाव येथे चापेकर चौकात श्री गणेश विसर्जन मिरवणूक स्वागत भेटीदरम्यान मा. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे तसेच मा. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे मॅडम, सहाय्यक पोलिस आयुक्त श्री मुकुटराव पाटील यांनी समितीच्या कामाचे कौतुक केले. चिंचवड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सर्वांचे स्वागत केले कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पोलिस प्रशासनाने मेहनत घेतली मिरवणूक अत्यंत शांततेत आणि आनंदात संपन्न झाली.

चिंचवड पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम रक्षक दल, महिला दक्षता समिती सदस्य, शांतता समिती सदस्य, यांच्या कामाची माहिती पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांना सुभाष मालुसरे आणि धनंजय कुलकर्णी यांनी दिली तसेच शांतता समितीचे सदस्यांना ड्रेस कोड म्हणून टी शर्ट चे वितरण करण्यात आले याबद्दल पोलिस आयुक्तांचे आभार मानण्यात आले.

सदर परीक्षण समितीमध्ये आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, अशोक तनपुरे, अजित वडगावकर, धनंजय कुलकर्णी, सुभाष मालुसरे, लक्ष्मण शिंदे, संदीप पोलकम ,संतोष सातारकर ,शशिकांत हुले व अविनाश हटकर यांनी सदस्य म्हणून काम केले .

संबंधित लेख

लोकप्रिय