Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : डॉ. के. टी .जाधव यांना ॲकॅडमीक एक्सलन्स ॲवार्ड प्रदान

PCMC : डॉ. के. टी .जाधव यांना ॲकॅडमीक एक्सलन्स ॲवार्ड प्रदान

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडियाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आकुर्डी येथील डी. वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे प्रवेश विभाग प्रमुख(ॲडमिशन इंचार्ज) डॉ. के. टी. जाधव ‘अकॅडमी एक्सलन्स (हेड ऑफ द डिपार्टमेंट)’ यांना ॲकॅडमीक एक्सलन्स ॲवार्ड देवून सन्मानित करण्यात आले.

डॉ.के.टी.जाधव हे गेली १६ वर्षापासून आकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलामध्ये ॲडमिशन इंचार्ज म्हणून कार्यरत आहे. तसेच बावडा येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात केमिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख म्हणून गेली २६ वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्या काळात सदर विभागामधून ५० हून अधिक उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले असून २०० हून अधिक विद्यार्थी विविध देशात उच्च पदावर कार्यरत आहेत.

तसेच २५ हून अधिक विद्यार्थी परदेशातील नामांकित विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन संशोधन कार्यात कार्यरत आहेत. संशोधन कार्य व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘अकॅडमीक एक्सलन्स’ ॲवार्डने ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स’चे अध्यक्ष डॉ. कृष्णराव गोडबोले यांच्या हस्ते त्यांना ‘हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, तेजस पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक, डॉ. ए. के.गुप्ता, आकुर्डीचे शैक्षणिक संकुल संचालक रेअर ॲडमिरल (नि) अमित विक्रम यांनी डॉ. जाधव यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय