Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याPCMC : आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांनी २४ तास संपर्कात राहावे -...

PCMC : आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांनी २४ तास संपर्कात राहावे – सहा. आयुक्त चंद्रकांत इंदलकर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षासह सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिल्या. (PCMC)

महापालिकेच्या वतीने मान्सून काळात करावयाच्या उपाय योजनांबाबत आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा (Disaster Management Action Plan) तयार करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर आपत्कालीन प्रतिसाद पथके स्थापित करण्यात आले आहेत. या पथकाच्या आदर्श कार्यप्रणाली बाबत मार्गदर्शन करण्यासाठी सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. pcmc

यावेळी उप आयुक्त मनोज लोणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, डॉ.अंकुश जाधव, राजेश आगळे, सिताराम बहुरे, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल कार्यकारी अभियंता विलास देसले, अनिल राऊत, अनिल शिंदे, अनुश्री कुंभार, नितीन देशमुख,मानिक चव्हाण, सतीश वाघमारे, महेश कावळे, नितीन निंबाळकर, राजेंद्र जावळे, व्ही. बी ओहोळ, एम, टी जावरानी, व्ही. के वायकर, देवन्ना गट्टूवार, प्रकाश कानोरे, प्रशासन अधिकारी कांबळे दशरथ तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथकासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. pcmc disaster management meeting

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपुर्व पाऊस सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पिंपरी चिंचवड शहर व शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पात्रात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. पावसामुळे शहरात गटार, रस्ते, नाला अशा ठिकाणी पाणी तुंबणे, पाणी घरात शिरणे, घराची पडझड होणे, वादळ वा-यामुळे झाडे पडणे अशा दुर्घटना घडू शकतात. या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, तसेच शहरात कोठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास संपर्क साधावा. pcmc

रात्रीच्या वेळी घडणाऱ्या दुर्घानांमुळे कोणतीही हानी होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकांसह सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

अतिमुसळधार पाऊस असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घराबाहेर पडल्यास काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शहरात आपत्ती संदर्भात घटना घडल्यास संबंधित पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचावे. घटनेची तीव्रता लक्षात घेऊन आवश्यक यंत्रणा तातडीने बोलवावी. त्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक २४ तास सुरु ठेवावेत तसेच तातडीने दुर्घटनास्थळी पोहचून परिस्थिती हाताळावी, असेही ते यावेळी म्हणाले. pcmc

क्षेत्रीय कार्यालायनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे प्रमुख संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी असणार आहेत. तसेच या पथकाचे सहाय्यक प्रमुख पथकातील कनिष्ठ अभियंता असणार आहेत.

पथकामध्ये स्थापत्य विभागाचे कनिष्ट अभियंता(१), जलनिस्सारण विभागाचे कनिष्ट अभियंता (१), आरोग्य निरीक्षक (१), सफाई कामगार (२) आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना महापालिकेचे नाव व लोगो प्रिंग केलेले फ्लोरोसंट ऍप्रॉन व फ्लोरोसंट कॅप देण्यात येणार आहे. तसेच या कामकाजासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांकडे अर्धा इंच जाडीचा ३० मीटर लांबीचा नायलॉन रोप (१), मोठ्या प्रकाशाची रिचार्जेबल टॉर्च (२), बॅरिकेडींग टेप (५), रेनकोट (८), गमबुट (८), सेफ्टी हेलमेट (८), रबर हॅन्डग्लोज (८), कुदळ, फावडे, घमेले(२), वाहन(१), मेगाफोन तसेच गरजेनुसार इतर आवश्यक साहित्य देण्यात आले आहे.

पथकासोबत मदतीकरिता दोन महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानांची नेमणूक करण्यात आली आहे. पथकांमधील सदस्यांनी आपल्या विभागाशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती बरोबरच आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देणे आवश्यक आहे. उद्भवलेल्या परिस्थितीनुसार आपल्या क्षेत्रीय अधिकारी आणि त्या संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क साधून आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करावी. महानगरपालिका क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रीय अधिका-यांनी आपत्कालीन परिस्थितीत मदत मागीतल्यास त्यासंबंधी कामकाज करावे.

याबाबत संबंधीत क्षेत्रीय अधिका-यांनी आपल्या पथकास अवगत करावे.पथकातील सदस्यांनी आपल्या क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधीत सर्व वरीष्ठ अधिकारी व आवश्यकतेनुसार अग्रिशामक विभागाचे संपर्क क्रमांकाची नोंद ठेवावी.सर्व क्षेत्रीय अधिका-यांनी आपल्या क्षेत्रातील नियंत्रण कक्षातील (control room)
फोन चालू असतील तसेच नेमणुक केलेले कर्मचारी नियंत्रण कक्षात उपस्थित असतील याची वारंवार खात्री करावी.

सर्व पथकांनी व नियंत्रण कक्षातील कर्मचा-यांनी एकमेकांशी समन्वय ठेऊन मान्सुन कृती आराखडा – २०२४ नुसार कामकाज करावे. तातडीच्या अतिरिक्त मदतीची गरज भासल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्कात राहुन पुढील कार्यवाही करावी. या पथकाच्या कामकाजाची वेळ रात्री १० ते सकाळी ६ ही असेल.

या वेळे व्यतिरीक्त आवश्यकतेनुसार क्षेत्रीय कार्यालयातील संबंधीत विभागाने मान्सुन कृती आराखडा २०२४ नुसार नेमुन दिलेले कामकाज करावे, असेही सह आयुक्त इंदलकर म्हणाले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय