Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा शिंदे गटात प्रवेश

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड मध्ये धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड मधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शक्तिशाली नेते राहुल कलाटे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

---Advertisement---

राहुल कलाटे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते आहेत. त्यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रात्री मुंबईत भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

राहुल कलाटे यांनी 2002 साली राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी 2014 साली शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर महापालिकेत कलाटे यांनी शिवसेनेचे गटनेते, शहराध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपद आदी महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले आहे.

---Advertisement---

2014 च्या विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढली, दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 2017 मध्ये प्रथम शिवसेनेकडून नगरसेवक झाले. महापालिकेत शिवसेनेचे गटनेते, तसेच शहराध्यक्ष होते. 2019 विधानसभेवेळी युती असताना बंडखोरी केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचितचा पाठिंबा मिळाला होता. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांविरोधात त्यांनी निवडणूक लढली होती.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील कार्यक्षम, युवकांमध्ये लोकप्रिय असलेले राहुल कलाटे यांना 2024 च्या चिंचवड विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गटाचा संभाव्य उमेदवार म्हणून संबोधले जात आहे.

कलाटे यांच्या मुंबई भेटीवेळी मुख्यमंत्री शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत कलाटे यांच्या चर्चा झाल्या असल्याचे समजते. त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक नवनाथ जगताप, संपत पवार, अश्‍विनी वाघमारे आदी प्रमुख पदाधिकारी व इतर मान्यवर कार्यकर्ते मुंबई येथे उपस्थित होते.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ब्रेकिंग : किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओवर सोमय्या म्हणतात…

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान

धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles