पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर:दि.१० -शिक्षणाचा ध्यास हाच देशाचा विकास गरजू,गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,शालेय शुल्क मदत देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे,हा उपक्रम आधार शैक्षणिक संस्था मागील १२ वर्षे राबवत आहे,शिक्षणासाठी मुलगी दत्तक घेऊन तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आधार संस्था मदत करत असते,असे संस्थेचे सचिव किशोर थोरात यांनी सांगितले.
सावित्रीच्या लेकीला साथ देण्याचा या उपक्रमा अंतर्गत मालपाणी महाविद्यालयाची कुमारी अक्षदा संदीप दळवी,पिंपळगाव निपाणी,ता.अकोले, जि.अहमदनगर या मुलीला मागील वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये तिची महाविद्यालयाची १६ हजार रु फी भरून तिचे BBA चे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य करण्यात आले होते.या काळात तिचे वडील अर्धांग वायूने पीडित होते,त्यामुळे तिला शिक्षण सोडण्याची वेळ आली होती.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240310-WA0327-1024x768.jpg)
आज मोशी,चिंचवड येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत लॅपटॉप देण्याचा प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी आधार शैक्षणिक संस्थेचे सचिव किशोर थोरात,विश्वस्त भगवान वायकर,विश्वस्त सुरज फलके,सदस्य रुपाली शिंदे,गौरव मांडे,प्रयाण शिंदे,संस्कृती थोरात आदी पदाधिकारी तसेच अक्षदा व तिचे मामा दीपक गागरे उपस्थित होते.
संस्थेचे विश्वस्त भगवान वायकर यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले तर विश्वस्त सुरज फलके यांनी संस्थेचे पुढील काही प्रोजेक्ट वर कसे काम करणार याचे काही मार्ग स्पष्ट केले.
आधार शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे हे काही कारणास्तव उपस्थित नसल्याने त्यांनी अक्षदा हिस फोन वरून शुभेच्छा दिल्या.