Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट कार्यान्वित नसल्यामुळे पवना प्रदूषित – नाना काटे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पवना नदी पुन्हा फेसाळली असून महापालिकेचा पर्यावरण विभाग दिखाव्यासाठी नाममात्र कारवाई करीत आहे. पालिकेने शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करण्याचे पाप माथी घेऊ नये, संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करणारी पवनामाई दूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई पालिका कधी करणार? दुषित पाणी पिण्यामुळे नागरिक दगवायची किंवा मोठी घटना घडण्याची वाट बघत आहे का? असा सवाल माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केला आहे. (Pavna pollution due to non-functional water treatment plant)

---Advertisement---

याबाबत नाना काटे यांनी सांगितले की,Vकरोडो रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र उभारूनही मैला मिश्रित सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने पाण्याला प्रचंड दुर्गंधी येते. पवना, इंद्रायणी शुद्धीकरणासाठी राज्य सरकार व पिंपरी चिंचवड महापालिका यांनी नदी शुद्धीकरणाची योजना आखून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. 

मात्र, सांडपाणी प्रक्रिया करणारे वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्यामुळे दूषित व मैला मिश्रित पाणी पवना नदीत मिसळले जात आहे. दरवर्षी पवनेचे प्रदूषण वाढत आहे. केजुबाई बंधाऱ्यात फेसळयुक्त रासायनिक पाणी व दूषित पाणी यामुळे मासे व जलचर मासे व जलचर मृत होत आहेत. थेरगाव येथील केजूदेवी बंधारा परिसरात नदीच्या पाण्यावर (दि. २१) रोजी सकाळी मोठ्या प्रमाणात पांढरा फेस आलेला दिसून आला आहे.

---Advertisement---

संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी वरदायनी असणाऱ्या तीर्थक्षेत्र असलेली पवनामाई नदीची दुरवस्था झाली आहे.

मागील जुलै महिन्यात १६ जुलै २०२३ रोजी पवना नदीपात्र असेच फेसाळले होते. त्यावेळी काही लॉंड्री व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला होता. नदी प्रदूषणात व्यवसाय करणाऱ्या बरोबर पावसाच्या वाहते पाणी, जलपर्णी, माती, कचरा, राडारोडा घाण मिसळते आणि पाणी दुषित होते. याशिवाय घराच्या छोट्या कारणाने पाणी प्रदूषित होतच असते.

नदीनाल्यात वाहने धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणं, कारखान्यांची वेस्ट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणं. केमिकलनं माखलेले कपडे – वस्तू पाण्यांत टाकणे, ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडणे असे अनेक प्रकार वारंवार होताना दिसत आहेत. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महापालिकेने पुढाकार घेत दोन्ही नद्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी अपेक्षित उपाय योजनांची गरज आहे. 

सांडपाणी, बांधकामाचा राडारोडा टाकून उभारलेले अनधिकृत भराव. त्यामुळे अरुंद होणारे नदीपात्र, यामुळे नदी सुधार प्रकल्प तातडीने राबविण्याचे नियोजन करावयास हवे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प गेली नऊ वर्ष रखडलेल्या अवस्थेत आहे. केवळ पवना व इंद्रायणी नदी सुधारसाठी कोट्यावधी रुपये निधीची तरतूद कागदावर न करता तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.

बँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज 

Pavna pollution
Pavna pollution
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles