Home ताज्या बातम्या मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा मंडप कोसळला, चार जण...

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा मंडप कोसळला, चार जण जखमी

Big News: Pavilion of Prime Minister Narendra Modi collapses, four injured

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ जिल्ह्यातील दौरा निश्चित झाला आहे. 28 फेब्रुवारीला पंतप्रधान यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. यासाठी यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू आहे. मात्र या सभेसाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळल्याची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येणार असून, त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. यासाठी भारी गावात 45 एकर जागेवर मंडप उभारण्यात येत असताना मंडप कोसळून चार कामगार जखमी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सभेसाठी डोम उभारले जात असतानाच त्याचे तीन पिल्लर खाली कोसळले आहेत. या घटनेतील जखमी मजुरांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी व बांधकाम विभागाचे अभियंता घटनास्थळी पोहोचले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा यवतमाळ जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहेत. 28 फेब्रुवारीला महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहे.

हेही वाचा :

ब्रेकिंग : मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना, आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळ

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप

नशेत तर्रर्र झालेल्या पोरींना उभंही राहता येईना, पिट्याभाईने दाखवली दवाखान्याची वाट

क्राईम : डॉक्टर फोनवर होते, तो आला आणि मानेवर केले 19 वार, नाशिकचा थरकाप उडवणारा VIDEO

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

NHM Nagpur : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

Exit mobile version