मुंबई : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात मोठी बातमी येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी समाजाला संबोधित केले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र होत आहे. अशात आता मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. आपल्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यामागेही देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
“मला सलाईनमधून वीष पाजून मारण्याचा कट रचला. त्यामुळेच मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मला मारायचंच असेल, तर येतो मी सागर बंगल्यावर, मला मारून दाखवा”, असं आव्हान जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलं आहे.
“मी आता चालत सागर बंगल्यावर जातोय. तिथे उपोषण करेन. जर रस्त्यात मी मेलो, तर मला देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर नेऊन टाका. आता मी एकतर मराठा आरक्षणाचा गुलाल तरी घेऊन येतो, नाहीतर देवेंद्र फडणवीसांना माझा बळी तरी देतो”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील सध्या आंतरवाली सराटीतील आंदोलन स्थळावरून निघून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नालेवाडी गावापर्यंत पोहोचले आहेत. सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. त्यामुळे सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा
नशेत तर्रर्र झालेल्या पोरींना उभंही राहता येईना, पिट्याभाईने दाखवली दवाखान्याची वाट
क्राईम : डॉक्टर फोनवर होते, तो आला आणि मानेवर केले 19 वार, नाशिकचा थरकाप उडवणारा VIDEO